शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणामुळे पतिराजांची धावपळ

By admin | Updated: December 22, 2016 23:20 IST

पुसेसावळी गट : तिन्ही जागा महिलांसाठी राखीव

राजीव पिसाळ ल्ल पुसेसावळीजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुसेसावळी जिल्हा परिषद गटात तिन्ही जागा महिला उमेदवारांसाठी आरक्षित झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला संधी नाही मिळाली तरी घरातून बाहेर जाऊ नये म्हणून सौभाग्यवतींना तिकीट मिळावे, यासाठी पतिराजांची धावपळ सुरू झाली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण बदलल्यामुळे जिल्हा परिषद उमेदवारांच्या संख्येत वाढ होणार नसल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे अनेकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.निवडणूक समोर आली की, नेत्यांसह भावी उमेदवारांना प्रत्येक मतदार महत्त्वाचा वाटतो. परिसरातील यात्रा, जत्रांना नेते मंडळींची वाढती उपस्थिती निवडणुकांची चाहूलच असल्यानेच दाखवत आहे.आपापल्या नेत्यांचे कार्यकर्ते कामांना लागलेले दिसत आहेत. गावागावांत आता गप्पा रंगू लागल्या आहेत की, ‘उमेदवारी कुणाला मिळणार, कोणता उमेदवार उभा राहिल्यास कोणत्या पक्षाला फायदा होईल, पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना न्याय मिळणार की खर्चीक उमेदवारांना? की नाराजांची फळी तिसरा पर्याय म्हणून उभी राहणार?’ अशा अनेक चर्चा रंगायला लागल्या आहेत. निवडणुकीच्या आधीच उभे राहिलेल्या उमेदवारांचे बंड थोपावणे नेतेमंडळींना अवघड जाणार, हे मात्र निश्चितच.त्यातच नगरपंचायत निवडणुकांमध्ये भाजपाने थोड्या फार प्रमाणात मारलेल्या मुसंडीमुळे जनसामान्यात एक वेगळी क्रेझ निर्माण झालेली आहे, त्यामुळे पुसेसावळी जिल्हा परिषद गटात पक्षाचे उमेदवार कोण असणार आहेत याची चर्चा रंगायला लागली आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तिसरा उमेदवार उभा राहिल्यास याचा फायदा कोणाला होणार! आणि तोटा कोणाला होईल? हे आत्ता तरी सांगणे कठीण आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या सर्वच नेत्यांना जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, जुन्या-नव्या वादांवर पडदा टाकून बेरजेचे राजकारण करणे गरजेचे आहे. त्यातच पुसेसावळी जिल्हा परिषद गटात काही नवीन गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे या गावांचा मेळ घालणेही आपल्याला विजयापर्यंत पोहोचू शकते, असे जाणकार कार्यकर्त्यांना वाटते. त्यामुळे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नेतेमंडळींना आपला कस दाखवावा लागणार आहे.