शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रिंगणस्थळाकडे जाणारा मार्ग प्रशस्त व्हावा -पंढरीची वाट लई अवघड :२

By admin | Updated: June 24, 2015 00:47 IST

तरडगावमध्ये सुविधांकडे दुर्लक्ष : तीन वर्षांपासून रखडलाय रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न

सचिन गायकवाड - तरडगाव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १८ जुलै रोजी सांप्रदायिक वारसा लाभलेल्या फलटण तालुक्यातील तरडगाव येथे येत आहे. भाविकांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाची जबाबदारीही वाढली आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील तरडगावमधील माउलींच्या पालखीच्या अंतर्गत मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण रखडले आहेत. पालखी सोहळ्यापूर्वी रस्ते रुंदीकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. बसस्थानक परिसर व गावातील मार्ग मोकळा श्वास कधी घेणार, असा सवाल उपस्थित होत आहे.वारीतील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे होते. हा सोहळा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. रिंगणस्थळी रस्त्याचे रुंदीकरण आवश्यक आहे. तसेच चांदोबाचा लिंब हे मंदिर रस्त्यालगत असल्यामुळे ते दुसऱ्या जागी बांधणार की तेथेच राहणार, याबाबत भाविकांमध्ये संभ्रमवस्था आहे. पालखी गावातून खांद्यावरून नेली जाते. चार ठिकाणी अभिषेक करून गावप्रदक्षिणा होते. दिंड्याही गावातून जातात. त्यामुळे मोठी गर्दी होते. अंतर्गत मार्गाची तात्पुरती डागडुजी न करता कायमस्वरूपी डांबरीकरण करणे गरजेचे आहे.रस्त्यांची दुरवस्था, तुंबलेली गटारे, रस्त्यावरून वाहणारे पाणी, अतिक्रमण, अर्धवट राहिलेले पुलाचे काम मोठी डोकेदुखी आहे. ही सर्व कामे प्रशासनाने पालखी सोहळ्यापूर्वी करावीत, अशी मागणी भाविक, नागरिकांमधून होत आहेत. पुलाचे काम अपूर्णचबसस्थानक परिसरात अपूर्णावस्थेतील पुलाचा डोलारा पालखी काळात डोकेदुखी ठरतो. पालखी, मोठी वाहने, दिंड्या पुलावरून जात असताना प्रशासनाला कसरत करावी लागते. पुलाचे काम रखडल्याने वाहतुकीचे तीनतेरा वाजतात. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.