शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवारांनी मनावर घेतल्यास पाटणकर पूर्वपदावर...

By admin | Updated: January 10, 2016 00:46 IST

पाटण दौरा : तालुक्यातील राष्ट्रवादीअंतर्गत मतभेद!

पाटण : राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार रविवारी पाटण तालुक्यात येत असून, शेतकरी मेळाव्यात ते तालुक्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी या कार्यक्रमाला तालुक्यातीलच राष्ट्रवादीचे दिग्गज उपस्थित राहणार का, असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. त्याहीपेक्षा विधानसभेतील पराभवाला राष्ट्रवादीअंतर्गत मतभेदाची किनार असल्याचे उघड आहे. म्हणूनच शरद पवारांनी मनावर घेतले तर आगामी आमदारकी राष्ट्रवादीच्या ताब्यात येणे सोपे होईल आणि पाटणकर गट पुन्हा सत्तेच्या पूर्वपदावर येर्ईल. पाटण तालुक्यात राष्ट्रवादीची एकास एक अशी दिग्गज मंडळी आहेत. हे सगळे दिग्गज कोणामुळे आहेत, हे सांगण्याची आवश्यकता नाही. त्यातीलच सिक्कीमचे राज्यपाल आणि दोन वेळा खासदारकी सांभाळलेले श्रीनिवास पाटील याच तालुक्यातील. त्यांचे पुत्र सारंग पाटील यांनासुद्धा राष्ट्रवादीने पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दिली. दुसरीकडे माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली. तिसरीकडे राज्याचे बांधकाम मंत्रिपद मिळविलेले माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर. एवढी सगळी राष्ट्रवादीची ताकद असताना पाटणची आमदारकी हातातून जाते. याचाच अर्थ राष्ट्रवादीतच रुसवे-फुगवे होते. याची कुणकुण पक्षश्रेष्ठींना असेलच, तरीसुद्धा लक्ष घालण्यावाचून राहिले आणि पाटणच्या २६ वर्षांच्या सत्तेला तडा गेला. आता तडा मोठे भगदाड होऊ लागले असून, दुरावा कायम आहे. त्यामुळेच सध्या निव्वळ पाटणकर समर्थकच विद्यमान आमदार शंभूराज देसार्इंशी दोन हात करताना दिसतात. बाकीच्यांनी नेते आणि राष्ट्रवादी पक्षाशी बांधील राहणेच पसंत केल्याचे दिसते. एकेकाळी मांडीला मांडी लावून बसणारे खासदार, आमदार आता एकमेकांची विचारपूसही करताना दिसत नाहीत. या सर्वांवर बहुगुणी मात्रा म्हणजे शरद पवार हेच आहेत. (प्रतिनिधी) पाटणकरांच्या व्यासपीठावर कोण कोण? बऱ्याच दिवसांनंतर शरद पवार पाटण तालुक्यात येत असून, जिल्ह्यातील राष्ट्रवादी त्यांच्या भेटीला येणार आहे. पण पाटण तालुक्यातील रथी-महारथी रविवारी होणाऱ्या पाटण येथील शेतकरी मेळाव्यात दिसणार का? विक्रमसिंह पाटणकरांच्या व्यासपीठावर यापूर्वीही शरद पवार आले असताना राष्ट्रवादीच्या काहींनी पाठ फिरविली होती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाकडे लक्ष लागून राहिले आहे.