शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात

By admin | Updated: September 4, 2015 20:28 IST

जागा नसल्याने धोका : रोज होतो एक टन कचरा गोळा

नाटोशी : गेल्या काही वर्षांत पाटणचा झपाट्याने विकास झाला़ यामुळे शहराबरोबरच लोकसंख्या ही वाढली आहे़ आज १५ ते २० हजारांच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या शहरास घनकचरा टाकण्यासाठी स्वत:ची जागा नसल्याने पाटणवासीय घनकचऱ्याच्या विळख्यात सापडले आहेत़ पाटण हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तहसील कचेरी, पंचायत समिती, न्यायालय, महाविद्यालय, तीन माध्यमिक विद्यालये आणि याचबरोबर अनेक शासकीय कार्यालये आहेत़ त्यामुळे पाटणमध्ये भाजी मार्केट, हॉटेल्स, स्टेशनरी दुकाने, हॉस्पिटल्स यांचा विकास झाला आहे़ सकाळी सात वाजल्यापासून दुपारी १ पर्यंत १ घंटागाडी आणि ग्रामपंचायत ट्रॅक्टर पाटण शहरातून किमान एक टन कचरा गोळा करत आहे. हा कचरा गोळा करत असताना ग्रामस्थ ओला व सुका कचरा हा वेगळा करत नाहीत़ तो एकत्र टाकला जातोय़ या कचऱ्यामध्ये खराब कपडे, सिमेंटची पोती, प्लास्टिक कागद, दुधाच्या, प्लास्टिक पिशवी, खराब हिरव्या पालेभाजा, क्लिनिकमधील कचरा आदी सर्व एकत्र गोळा केले जाते. त्याचबरोबर सायंकाळी रामापूर ते केरा पूल यादरम्यान किमान २० हॉटेल्स, दुकाने, चहाचे गाडे, वडापावच्या गाड्या येथूनही ओला कचरा गोळा केला जातो़ हा जमा झालेला कचरा हा कोठे तरी मोकळ्या जागेत टाकला जातो, त्यामुळे कचरा टाकलेल्या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली जात असून लोकांच्या ओराग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे़  हा कचरा असाच वाढत राहिल्यास पाटण शहरातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल़ मार्केटयार्ड ते विठ्ठल मंदिराकडे जाणारा रस्ता, केरा पूल, कळकेचाळीकडे जाणारा रस्ता, धांडे पूल, पाटण बस स्टेशन, या परिसरात घाणीचे साम्राज्य जास्त असते. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे़ (वार्ताहर)घनकचरा या प्रश्नाचा विचार हा समाजातील सामाजिक संघटना, रोटरी क्लब, गणेशोत्सव मंडळ, बचत गट यांनी करून घनकचरा व्यवस्थानाबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे़ घनकचरा होणार नाही, यांची प्रत्येकानेच काळजी घेतली पाहिजे़ घरातून निघतानाच बाजारासाठी कापडी पिशवीच घेऊन बाहेर पडावे़ दुकानदार प्लास्टिक पिशवी देत असल्यास त्यास विरोध करावा़. --- लक्ष्मण चव्हाण, ग्रामस्थ, पाटण पर्यावरणाचे रक्षण करणे, हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे आणि यांची सुरुवात प्रत्येकाने आपल्या घरापासून करावी़ आपल्या घरासमोर परिसर प्रत्येकानेच स्वच्छ ठेवावेत आणि संदूर पाटण ठेवण्यास सर्वांनी मदत करावी़ -चंद्रकांम मोरे, उपसरपंच, पाटण दुधाच्या पिशव्या, तेलाच्या पिशव्या आदी प्लास्टिक एकत्र करून भंगारात घालाव्यात़ प्रत्येकानेच आपल्या मोकळ्या जागेत घनकचरा ओला व सुखा कचराऱ्याचे विभाजन करून त्यांची विल्हेवाट लावली पाहिजे़ ओला कचरा प्रत्येकाने आपल्या परस बागेत सेंद्रिय खत म्हणून वापर केला पाहिजे़   -अजय कवडे, ग्रामपंचायत सदस्य,