शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
3
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
4
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
5
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
6
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
7
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
8
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
9
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
10
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
11
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
12
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
13
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
14
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
15
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
16
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
17
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
18
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
19
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
20
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!

पाटण पोलिसांना मिळणार हक्काची घरे

By admin | Updated: February 11, 2016 23:57 IST

प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे : राज्य शासनाकडून ३ कोटींचा निधी मंजूर

मल्हारपेठ : राज्यातील पोलिसांना राहण्यासाठी शासनाकडून पोलिसांच्या निवासाचा प्रश्न कायमचा निकालात काढण्याचा प्रयत्न करीत असतानाच पाटण पोलिसांच्याही हक्काच्या घरांचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. राज्यशासनाकडून पाटण पोलिसांच्या घरासाठी तब्बल ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्यातील पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी फडणवीस सरकार गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये तसे वक्तव्येही केले होते. पाटणमध्ये झालेल्या दौऱ्याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना तसे विधान केले होते. सर्वसामान्यांचे रक्षण करण्यासाठी रात्रीचा दिवस करणारे महाराष्ट्र पोलीस स्वत:च्या हक्काच्या घरापासून वंचित आहेत. ज्या घरांमध्ये ते राहतात ती घरे अनेकवेळा धोकादायक असल्याचे चित्र समोर आले होते. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने पोलिसांच्या घरांचा प्रश्न गांभीयार्ने घेण्यास सुरुवात केली. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनीही तालुक्यातील विविध विकासकामांसाठी ९६ कोटी रुपयांचा निधी मिळविताना विधिमंडळाच्या अधिवेशनात पाटण पोलिसांच्या घरांचा प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्याचेच फलीत म्हणून आता सातारा जिल्ह्यातील पाटणसारख्या दुर्गम भागातील पोलिसांच्या नवीन घरांचा प्रश्न मिटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य शासनाने पाटण पोलिसांच्या नवीन सुसज्ज सदनिकेसाठी तब्बल २ कोटी ७९ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. या निधीतून पाटण पोलिसांसाठी एकूण बारा नवीन सुसज्ज घरांचे बांधकाम होणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घरांच्या बांधकामासाठी नवीन जागा निश्चिती करण्यात येत आहे. (वार्ताहर)सर्व सुविधांचा समावेश : गिड्डेपाटण येथे १९०१ साली ब्रीटीश कालीन पोलीस चाळ बाधली होती.११५ वर्षा पूवीर्ची ६ खोल्यांची एक अशा दोन बारा खोल्यांची व दोन अधिकारी यांच्या साठी दोन अशा ३ कोटी बजेट असलेले कर्मचारी आर सीसी निवास बांधण्याचे काम सुरू आहे.त्याकरीता जुनी इमारत पाडून त्या जागेवर सर्व सोईनीयुक्त पोलीसांची घरे होत असल्याची माहीती पोलीस निरीक्षक संजय गिड्डे यांनी दिली.जिल्ह्यातील पोलिसांची प्रतीक्षापाटणप्रमाणेत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलिसांसाठी घरे बांधून द्यावेत, अशी मागणी पोलिसांमधून होत आहे.