शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पाटणला ‘मराठा मोर्चा’चे ठिय्या आंदोलन परिसरात घोषणा : व्यापाऱ्यांकडूनही प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:21 IST

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवारी पाटण येथे मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सर्वांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले

ठळक मुद्देतहसीलदारांना दिले मागण्यांचे निवेदन

पाटण : मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने शनिवारी पाटण येथे मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, सर्वांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनही केले. या आंदोलनाला पाटण तालुक्यातील हजारो मराठा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

पाटण येथील झेंडा चौकात सर्व मराठा समाजबांधव एकत्रित आले. यावेळी सर्व समाजबांधवांनी चौकातून तहसील कार्यालयावर पायी चालत मोर्चा काढला. तसेच पाटण तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडला. यावेळी मराठा समाजाला संघर्षाशिवाय मागण्या मान्य होणार नाहीत. त्यासाठी मराठा समाजाने रस्त्यावर उतरले पाहिजे. ‘आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आता रडायची नाही तर लढाईची वेळ आली आहे,’ असा इशारा समाजबांधवांच्या वतीने सरकारला देण्यात आला.

‘आजपर्यंत मराठा समाजाने शाततेच्या मार्गाने अनेक मोर्चे काढले. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. शासनाने मराठा समाजाचा अंत पाहू नये. जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर होत नाही, तोपर्यंत शासनाने नवीन भरती करू नये. ही वादळापूर्वीची शांतता आहे. आम्हाला आमचा हक्क द्या,’ अशा तीव्र भावना मराठा समाजातील युवकांनी ठिय्या आंदोलनावेळी व्यक्त केल्या.पाटण येथे शनिवारी मराठा समाजबांधवांनी केलेल्या ठिय्या आंदोलनास शहरातील अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिला. यावेळी काढलेल्या मोर्चात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा, मागण्या आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत,’ अशा घोषणा समाजबांधवांनी दिल्या. मोर्चा तहसील कार्यालयाजवळ आला असता सर्वांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला. त्यानंतर संजय इंगवले, चंद्रहार निकम, सुरेश पाटील, दिनकर माथने यांच्यासह अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आणि तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देण्यात आले. मोर्चा सर्वांमुळे शांततेत पार पडला. मोर्चास पाटण तालुक्यातील शेकडो बांधव सहभागी झाले होते. यावेळी पाटण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यू. एस. भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी मोर्चाच्या मार्गावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.पोलीस प्रशासनाकडून खबरदारीपाटण पोलीस स्टेशन प्रशासनाच्या वतीने सकाळी सुरू करण्यात आलेला बंदोबस्त सायंकाळी सात वाजेपर्यंत उशिरापर्यंतही ठेवण्यात आला होता. तालुक्यात कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली होती. संघटनेच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्चावेळी व ठिय्या आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा सुरक्षिततेच्या दृष्टीने तैनात करण्यात आला होता.