शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

पाटणला वादळी वाऱ्याचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 23:52 IST

उंब्रज/ मल्हारपेठ /मलकापूर : कºहाडसह पाटण तालुक्यातील मल्हारपेठ विभागाला गुरुवारी सायंकाळी वादळी वाºयाचा तडाखा बसला. कºहाड-चांदोली मार्गावर तीन किलोमीटरच्या ...

उंब्रज/ मल्हारपेठ /मलकापूर : कºहाडसह पाटण तालुक्यातील मल्हारपेठ विभागाला गुरुवारी सायंकाळी वादळी वाºयाचा तडाखा बसला. कºहाड-चांदोली मार्गावर तीन किलोमीटरच्या अंतरात वीस ते पंचवीस झाडे मोडून पडली. तर पाटण तालुक्यातील उरूल विभागात अनेक घरांचे छत उडून गेले.कºहाड शहरासह मलकापूर, उंब्रज, पाचवड परिसरात गुरुवारी सायंकाळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र धावपळ उडाली. साडेचार वाजण्याच्या सुमारास कºहाडसह आगाशिवनगर, चचेगाव परिसरात जोरदार वाºयाने हजेरी लावली. पंधरा ते वीस मिनिटे पडलेल्या पावसामुळे वाढलेल्या उकाडा काहीकाळ नाहीसा झाला. मलकापूर येथील भाजीमंडई दुपारपासूनच भरण्यास सुरुवात होते. काही शेतकरी व छोटे-छोटे व्यावसायिक भाजी विकण्यासाठी मंडईत रात्री आठ वाजेपर्यंत थांबतात. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांची चांगलीच धावपळ झाली.कोरीवळे येथे वादळी वाºयासह अवकाळी पावसाने थैमान घातले. गावातील तीस घरांवरील पत्रे उडून गेले. त्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले. शेतातील जनावरांचे शेड, गंजी आदींचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर नजीकच्या साबळवाडी गावाजवळ विजेच्या खांबावर बाभळीचे झाड पडल्याने विजेचा खांब मोडला. तारा तुटल्याने साबळवाडी, कोरीवळे गावचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे घरातील कपडे, धान्य यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणीच पाणी झाले. धान्य भिजल्यामुळे व पाणी घरात शिरल्यामुळे धान्याचा लगदा झाल्याचे कित्येक घरात दिसून आले. वादळी वाºयामुळे शेतात असणारी जनावरांची शेड व वैरणीच्या गंजी उडून गेल्या आहेत.रमेश निगडे, राजेंद्र निगडे, संपत निगडे, तानाजी निगडे, हणमंत निगडे, विकास हत्ते या सहाजणांच्या एकत्रित घरावरील संपूर्ण पत्रा उडून गेला आहे. सोमनाथ मोहिते, बबन मोहिते, संदीप मोहिते, विनायक मोहिते, हिंदुराव मोहिते, बाळासो मोहिते, उद्धव मोहिते, प्रदीप मोहिते, प्रभाकर मोहिते, संजय मोहिते, काकासो मोहिते, बबई काटे, आनंदा पवार, संपत मोहिते, संतोष निगडे, आनंदराव निगडे, संतोष नलवडे, शिवाजी निगडे, बाळासो सुतार, संभाजी मोहिते, मारुती मसुगडे, राजेंद्र मोहिते यांच्या घरांवरील पत्रे या वादळात उडून गेले आहेत.वादळी वाºयासह पावसामुळे कºहाड ते चांदोली रस्त्यावर पाचवड फाटा ते धोंडेवाडीदरम्यान रस्त्यावरील सुमारे वीस ते तीस झाडे मोडून पडली. तर काही झाडे मोडून पडली. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती.उरूल विभागातहीमोठे नुकसानउरूल गावासह भागातील ठोमसे, बोडकेवाडी, पोळाचीवाडी, तांबेवाडी गावातील घर व जनावरांच्या शेडवरील पत्रे उडून गेले. उरूल गावातील महेश निकम, उमेश निकम यांच्या शेडवरील पत्रा तर सुनील देसाई, लक्ष्मण पवार यांच्या घरावरील पत्रा उडून गेला आहे. तर बोडकेवाडीतील अप्पासो ज्ञानदेव देसाई, अविनाश श्रीरंग शेडगे, शोभा शंकर देसाई, संतोष निवृत्ती देसाई यांच्या जनावरांच्या शेडवरील पत्रा उडला आहे.