शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वाहकाच्या हाताला चावा घेऊन प्रवासी पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:18 IST

गोडोली : एसटी तिकीट सवलतीसाठी प्रवासा दाखविलेले अपंगाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे सांगून वाहकाने ते स्वत:कडे ठेवल्याचा राग मनात धरून प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पोवई नाक्यावर घडली.सातारा बसस्थानकातून मिळालेली माहिती अशी की, भोईसर आगाराची एसटी बस ही कोल्हापूर हून भोरकडे निघाली ...

गोडोली : एसटी तिकीट सवलतीसाठी प्रवासा दाखविलेले अपंगाचे प्रमाणपत्र हे बनावट असल्याचे सांगून वाहकाने ते स्वत:कडे ठेवल्याचा राग मनात धरून प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. ही घटना रविवारी सकाळी नऊच्या सुमारास पोवई नाक्यावर घडली.सातारा बसस्थानकातून मिळालेली माहिती अशी की, भोईसर आगाराची एसटी बस ही कोल्हापूरहून भोरकडे निघाली होती. कºहाड बसस्थानकावर एका बसमध्ये एक प्रवासी बसला. त्याने वाहकाकडे साताºयाचे तिकीट मागून त्याच्याकडे असलेले अपंगाचे प्रमाणपत्र दाखवले. मात्र संबंधित प्रमाणपत्र बनावट असल्याचे वाहकाच्या निदर्शनास आल्याने वाहकाने ते प्रमाणपत्र स्वत:कडे ठेवून घेतले होते.पोवई नाक्यावर बस येताच प्रवाशाने प्रमाणपत्र मागण्यास सुरुवात केली. मात्र, वाहकाने त्यास नकार दिल्याने चिडलेल्या प्रवाशाने वाहकाच्या हाताला चावा घेऊन पळ काढला. यामध्ये वाहक रमेश नारायण गुडे (वय ५५, रा. गुडे, ता. पाटण) यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला इजा झाली. वाहकाने जप्त केलेल्या त्या ओळखपत्रावर सोलापूर जिल्हा समाजकल्याण अधिकाºयांची सही, शिक्का आहे. संबंधित प्रवाशाचे नाव धीरज गंगाराम पाटील (रा. कर्णिकनगर, सोलापूर) असे त्या ओळखपत्रात नमूद केले आहे.मोठे रॅकेट असल्याची शक्यताधीरज पाटील या प्रवाशाकडे सापडलेले अपंग व पत्र आहे बनावट असून, या पाठीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता एसटीच्या अधिकाºयांनी वर्तवली आहे.