शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पुसेगाव बैलगाडी शर्यतीचे भवितव्य धोक्यात

By admin | Updated: December 16, 2014 00:03 IST

कोरेगावच्या गुन्ह्यामुळे संभ्रम : परवानगी मिळविण्यासाठी यात्रा कमिटीसह मान्यवरांची धावपळ सुरू

केशव जाधव - पुसेगाव -श्री सेवागिरी यात्रेचे मुख्य आकर्षण हे बैलगाड्यांच्या शर्यती असते. यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून शेतकरी येत असतात. मात्र, रविवारी कोरेगाव येथे बैलगाडी शर्यत संयोजकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पुसेगाव यात्रेतील बैलगाड्या शर्यतींचे भवितव्य काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बैलगाड्यांच्या शर्यती भरवाव्यात किंवा नाही, यासंदर्भात राज्यात विविध मतप्रवाह आहेत. गेल्या वर्षीही बैलगाड्यांच्या शर्यतीवर शासनाने बंदी घातली होती. मात्र, श्री सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा तोंडावर आली असतानाच अचानक बंदी उठली आणि यात्रेत ठरल्याप्रमाणे शर्यती पारही पडल्या. हाच प्रकार त्यापूर्वीही अनेकदा झाला होता. यावर्षीही शासनाची शर्यतीवरील बंदी कायमच राहिली होती; पण काही दिवसांपूर्वी पर्यावरण मंत्रालयामार्फत या शर्यतींवरील बंदी शिथील केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या अन् कोरेगाव भागात बैलगाडी शर्यती भरवल्याबाबत संयोजकांवर गुन्हा दाखल झाला. पुसेगाव यात्रेत बैलगाड्यांच्या शर्यती न पाहण्याचा योग कधीच आला नाही; पण यावर्षी काय होणार? याविषयी चर्चा रंगायला लागल्या आहेत.व्यावसायिकीतून भरवलेला बैलगाड्यांचा बाजार आणि यात्राकाळात होणाऱ्या शर्यती यात फरक आहे. पुसेगावच्या बैलगाडी आखाड्याच एक नंबरचे बक्षीस पटकाविणाऱ्या बैलजोडीला मोठा मान मिळतो; पण त्यांची किमत ही चांगलीच वाढलेली असते. या जातिवंत,चपळ बैलांची पैदास करणाऱ्या देशी खिलार गाईला त्यामुळे तर शेतकरी वर्गात चांगली मागणी असते. शर्यतीवर बंदी येत असल्याने देशी गार्इंची मागणी कमी होऊ लागली होती. खटाव तालुक्यातील कित्येक शेतकऱ्यांकडे मुंबई, कल्याण, डोंबविली येथील बैलगाडी शौकिनांची खोंडे जोपासण्यासाठी ठेवलीही जातात. त्यासाठी त्यांचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्याला रोजगारही मिळत होता. पोटच्या मुला इतकी मेहनत या खोंडाच्या देखभालीसाठी घेतली जाते. बंदीमुळे शेतकऱ्यांच्या हौसेला मर्यादा पडल्या आहेत. शर्यती पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून हजारो शौकीन पुसेगावात येतात. त्या दिवशी लाखोंची उलाढाल होते. बैलगाडींचे मालक कित्येक दिवस मेहनत घेत असतात. काही अटींवर का होईना शर्यतीवरील बंदीबाबत घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेत बैलगाडी शर्यती आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र शासनाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली तर खऱ्या अर्थाने जातिवंत खिलार जनावरांची पैदास करणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल.- विजय जाधव, विश्वस्त, सेवागिरी देवस्थान पुसेगाव यात्रेतील मैदानापूर्वीच बैलगाडी शर्यत भरविण्याचा परवाना मिळावा. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मंगळवारी सायंकाळी खासदार राजू शेट्टी यांच्यासमवेत चर्चा होणार आहे. - धनाजी शिंदे, प्रमुख, बैलगाडी शर्यती कृती समिती बैलगाडी शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, यासाठी विविध राज्यांतून प्रयत्न सुरू आहेत. तामिळनाडू, हरियाणा व पंजाबमधील असंख्य खासदारांनी तशी मागणीही केली आहे. पुसेगावच्या बैलगाडी शर्यतीचे मैदान भरवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्नशील आहोत.- आनंदा पैलवान,बैलगाडी शौकीन, रेठरे बुद्रुक