शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांनी केली कोंडी; नाही तर मांडीला मांडी

By admin | Updated: October 2, 2014 22:23 IST

पाटण : स्वतंत्र लढाईमुळे अनेकांची गोची, इच्छा नसताना उमेदवारी

अरुण पवार - सातारा -पाटणमध्ये आमदार विक्रमसिंह पाटणकर व शंभूराज देसाई या प्रमुख नेत्यांनी आजवर मिळविलेली आमदारकी इतर पक्ष, व्यक्ती व संघटनांनी हातभार लावल्यामुळे मिळविली, हे निकालाच्या आकडेवारीवरून जाणवते. मग त्यासाठी अशा मंडळांची मनधरणी करताना साम, दाम, दंड, भेद मार्गाचा अवलंब झाला नसेल तर ती निवडणूक कसली. या खेपेस मात्र स्वतंत्र लढायचा निर्णय सर्वच पक्षांनी घेतल्यामुळे परंपरेप्रमाणे दोन्ही नेत्यांच्या छावणीत जाऊन मांडीला मांडी लावायचा बेत फसला. इच्छा नसताना अनेकांना उमेदवारी करावी लागत आहे. त्यातच पंचवार्षिक मिळणारी पुंजी हातातून गेली, अशी गत झाली आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी पाटणमध्ये सत्यजित पाटणकर (राष्ट्रवादी), शंभूराज देसाई (शिवसेना), हिंदुराव पाटील (काँग्रेस), रवींद्र शेलार (मनसे), दीपक महाडिक (भाजप) अशा प्रमुख उमेदवारांची लढती होणार आहेत. काँग्रेसमधून हिंदुराव पाटलांचा एकमेव अर्ज उरला आहे. नरेश देसाई यांचा काँग्रेसमधून भरलेला अर्ज बाद झाला. तर भाजपचे प्रकाश पाटील यांचा अर्ज बाद झाला. त्यामुळे आता वरील उमेदवारांसह इतर छोटे पक्ष व अपक्षांची बहुरंगी लढत प्रथमच पाहावयास मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या पाटण विधानसभा निवडणुकीत देसाई-पाटणकर आणि इतर एक-दोन अपक्ष उमेदवार अशी लढत झाली. मग बाकीचे पक्ष व त्यांचे नेते, कार्यकर्ते काय करायचे? हे पाटणची जनता जाणून आहे.देसाई-पाटणकरांच्या झुंजीत आपली डाळ शिजणार नाही. मग वाहत्या गंगेत हात धुवून घ्यायचे, असाच पवित्रा काही जणांंचा असायचा. मात्र, त्यांच्या पाठिंब्यावरच देसाई-पाटणकरांचा जय-पराजय ठरायचा. यावेळेस मात्र सगळ्याच पक्षांचा सवतासुभा असल्यामुळे आतल्या हाताने काम करायची संधी हुकली आणि नेमकी उमेदवारीच गळ्यात पडली, अशी काहीची अवस्था झाली आहे. त्यामुळे आता देसाई-पाटणकर गटांची भिस्त नेते व कार्यकर्ते यांच्यावरच अवलंबून राहणार आहे.काँग्रेसचे उमेदवार हिंदुराव पाटील हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यांच्या पत्नी मंदाकिनी पाटील सध्या जिल्हा परिषद सदस्या आहेत. त्यांचा ढेबेवाडी विभागात वरचष्मा आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी अनेकवेळा किंगमेकरची भूमिका दाखवून दिली आहे. मनसेने उमेदवार बदलून रवींद्र शेलार यांना दिली. गतवेळेस अविनाश पाटील (बनपुरी) यांना मनसेने उमेदवारी दिली होती. त्यांनी दोन हजार मते मिळविली. पाटील देसाई कारखान्याचे व्हा. चेअरमन होते. सागर माने हे जि.प.चे माजी कृषी सभापती बाळासाहेब माने यांचे पूत्र आहेत. यांच्यासह इतरांना टक्कर देत सत्यजित आणि शंभूराज यांना कितपत लक्ष्य गाठता येते, हे पाहावे लागणार आहे.