शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

परळीचे ग्रामसचिवालय सर्वोत्तम

By admin | Updated: June 14, 2015 23:56 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी गौरवोद्गार

परळी : ‘सातारा तालुक्यातील सर्वोत्तम ग्रामसचिवालय हे परळीचे आहे. परळी गावच्या ग्रामसचिवालयाप्रमाणे इतर गावातील ग्रामस्थांनी अशाच प्रकारच्या इमारती उभ्या कराव्यात. आगामी काळात राज्य शासनाच्या चौदाव्या वित्त आयोगाकडून शंभर टक्के निधी प्रत्यक्ष ग्रामपंचायतींनाच मिळणार आहे. या निधीचा उपयोग करून गावाचा पूर्ण विकास करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. परळी येथील ग्रामसचिवालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, कृष्णा खोरेचे व उरमोडी धरणाचे अभियंता दाभाडकर, महाराष्ट्र राज्य महामंडळाचे विभाग नियंत्रक धनाजीराव थोरात, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सरपंच सतीश बोबडे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले व मान्यवरांच्या उपस्थितीत सज्जनगड फाटा ते भातखळे या ८०० मीटर रस्त्याचे उद्घाटन, बौद्धवस्ती पाणीपुरवठा योजना उद्घाटन, मागासवर्गीय जीम साहित्य लोकार्पण सोहळा, रवळीनाथ मंदीर रस्ता उद्घाटन, अंगणवाडी इमारत उद्घाटन, गावातील सर्व अंतर्गत रस्त्यांची उद्घाटने, परळी गावातील व्यायाम साहित्याचा लोकार्पण सोहळा, उरमोडी नदीवरील साकव पुलाचे भूमीपूजन, घंटागाडी लोकार्पण सोहळा, ग्रामपंचायत व्यापारी संकुलातील गाळ्यांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवेंद्रराजे भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे परळी ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार करण्यात आला. तसेच परळीचे ग्रामसेवक के. एस. मोहिते यांची बदली झाल्यामुळे त्यांचाही सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)