शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

सातारा बसस्थानकात होणार वाहनतळ

By admin | Updated: November 21, 2014 00:26 IST

सातारा विभाग : सीसीटीव्ही कॅमेरे अन् नियंत्रण कक्षासाठी निधीची तरतूद

सातारा : राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात वाहनतळाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकाच्या सुशोभीकरणासाठी चालू आर्थिक वर्षासाठी पाच कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यातील एक कोटी ७१ लाख बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी खर्च करण्यात येणार आहे.खासगी प्रवासी वाहतुकीशी स्पर्धा करत एसटी महामंडळ विकासाच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. प्रवाशांना आपल्या खेचण्यासाठी अत्याधुनिक व चकाचक बसस्थानक तयार करण्याचा विचार आहे. यामध्ये बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या विकास कामासाठी ५ कोटी ३२ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याअंतर्गत बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ७१ लाखांची तरतूद केली आहे. यासंदर्भात नियोजन विभागाने मे २०१४ मध्ये पत्रव्यवहार केला होता. हा सर्व निधी २०१४-१५ या वर्षातच खर्च करायचा आहे. शासनाच्या सर्वसाधारण योजनेअंतर्गत २०१४-१५ मध्ये १९० सार्वजनिक क्षेत्रे व इतर उपक्रमाअंर्तगत राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाअंतर्गत बांधकाम व इतर सुविधा पुरविण्यासाठी सातारा बसस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी पाच कोटी ३२ लाखांचा तरतूद केली आहे. यामधून चालकवाहकांना विश्रांतिगृह, महिला वाहक व कर्मचाऱ्यांसाठी विश्रांतिगृह, बसस्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरण, आगाराच्या वाहनतळाचे क्राँक्रिटीकरण, सीसीटीव्ही व्यवस्थापक व नियंत्रण कक्ष व बस आत व बाहेर जाण्याच्या फाटकाचा समावेश आहे. सातारा मध्यवर्ती बसस्थानकात दररोज हजारो प्रवासी येततात. त्यांची वाहने उभी करण्यासाठी जागेचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्या ठिकाणी सशुल्क वाहनतळही नाही. एसटी गाड्यांना वाहनांचा अडथळा होऊ नये म्हणून पार्सल कार्यालयाच्या बाजूला लोखंडी अँगल लावून जागा केली आहे. मात्र, ही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे यातून चांगली सोय होऊ शकते. (प्रतिनिधी)