शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

पालक ऊसतोडीला जाताच मुले दौंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:14 IST

कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा ...

कºहाड : ऊसतोड मजुरांची तीन अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता झाली. त्यांच्या आर्इंनी आक्रोश केला. बापानी पोलीस स्टेशन गाठलं. अपहरणाचा गुन्हाही दाखल केला. आणि पोलिसांच्या तपासात ती तीन्ही मुलं त्यांच्याच एका नातेवाईकांकडे दौंडमध्ये आढळली. कºहाड शहर पोलिसांनी तातडीने तपास केल्यामुळे मुलांचा शोध लागला. आणि पालकांचा जिव भांड्यात पडला.जालना जिल्ह्णातील मानेपुरी गावातील काही ऊसतोड मजूर कºहाड तालुक्यातील केसे गावात मजुरीसाठी आले आहेत. गावातील नविन गावठाणात भैरवनाथ मंदिराजवळ झोपड्यांमध्ये या कुटूंबांचे वास्तव्य आहे. संबंधित कुटूंबांतील पुरूष आणि महिला दररोज सकाळी ऊसतोडीसाठी जातात. रात्री उशिरा ते झोपडीकडे परत येतात. दिवसभर झोपडीत त्यांची मुलेच असतात. अशातच २९ जानेवारी कुटूंबातील दशरथ रोहिदास पवार (वय १४), बारीक अशोक ठाकरे (८) व गोरख बबन बर्डे (१६) ही मुले अचानक बेपत्ता झाली. संबंधित मुलांच्या आर्इंनी आक्रोश सुरू केला. मजुरांसह आसपासच्या ग्रामस्थांनी गावात तसेच आसपासच्या परिसरात मुलांचा शोध घेतला. काही नातेवाईकांनाही फोनवरून संपर्क केला. मात्र, मुले सापडली नाहीत. ३१ जानेवारी रोजी रोहिदास अंबादास पवार (वय ४०) यांनी कºहाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञातांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला.पोलीस उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. बेपत्ता असलेल्या मुलांपैकी गोरख बर्डे या मुलाकडे मोबाईल होता. मात्र, तो बंद लागत होता. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुले दौंडमध्ये असल्याचे समोर आले. पोलीस पथक तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यावेळी गोरख बर्डे या मुलाचा भाऊ दौंडमध्ये राहत असल्याचे व संबंधित तीन्ही मुले त्याच्याकडे गेली असल्याचे समोर आले. तिघांना ताब्यात घेऊन कºहाड शहर पोलीस ठाण्यात आणले. रविवारी सकाळी संबंधित मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले.साठवलेल्या पैशातून केला प्रवासदशरथ, बारीक आणि गोरख या तिन्ही मुलांकडे साठवलेले थोडे थोडे पैसे होते. तसेच गोरखकडे मोबाईल होता. साठवलेले पैसे या तिघांनी एकत्र करून दौंडला जायचा बेत आखला. घरात सांगीतलं तर जाऊ देणार नाहीत, असे त्यांना वाटत होते. त्यामुळे घरात कोणाला काहीही न सांगता ते एसटीने दांैडला गेल्याचे तपासातून समोर आल्याचे उपनिरीक्षक भारत चंदनशिव यांनी सांगीतले.