शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यानगरात नववधूसह माता-पित्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:45 IST

कºहाड : नवविवाहित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी राहत्या घरी आत्महत्या केली. विद्यानगर-सैदापूर (ता. कºहाड) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ...

कºहाड : नवविवाहित मुलीसह तिच्या आई-वडिलांनी राहत्या घरी आत्महत्या केली. विद्यानगर-सैदापूर (ता. कºहाड) येथे शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.शिवाजी आनंदा मोहिते (वय ५९), बेबी शिवाजी मोहिते (५२) आणि वृषाली विकास भोईटे (२४) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कºहाड तालुक्यातील उंब्रज येथील मोहिते कुटुंबीय अनेक महिन्यांपासून विद्यानगर येथे गाडगे महाराज महाविद्यालया-मागील गुरुदत्त कॉलनीत वास्तव्यास होते. कॉलनीत त्यांचा छोटेखानी बंगला आहे. शिवाजी यांचा मुलगा विराज हा पुणे येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे, तर मुलगी वृषालीचा दोन महिन्यांपूर्वी ९ फेब्रुवारी २०१९ रोजी विवाह झाला होता. वाघोली-वाठार स्टेशन हे वृषालीचे सासर आहे. विवाहानंतर काही दिवसांनी वृषाली माहेरी विद्यानगर येथे आई-वडिलांकडे राहण्यास आली होती.दरम्यान, शुक्रवारी दुपारी वृषालीने विषारी (पान १ वरून)औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे वडील शिवाजी व आई बेबी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी पुण्यात असलेल्या विराजला फोन करून याबाबतची माहिती दिली. विराजने विद्यानगर येथील त्याच्या मित्रांना फोन करून तातडीने घरी जाण्यास सांगितले. तसेच तोही पुण्यातून कºहाडला येण्यासाठी निघाला. काही वेळातच त्याचे मित्र घरी पोहोचले. त्यावेळी घरातील सोफ्यावर वृषाली मृतावस्थेत पडल्याचे त्यांना दिसले. तर शिवाजी व बेबी यांनी घरातील फॅनच्या हुकला एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. संबंधित युवकांनी याबाबतची माहिती कºहाड शहर पोलिसांत दिली.माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी तातडीने त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. घटनेची नोंद कºहाड शहर पोलिसांत झाली आहे.-----------कारण कौटुंबिक की आणखी काही?शिवाजी, बेबी आणि त्यांची मुलगी वृषाली यांच्या आत्महत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. कौटुंबिक वादातून की आणखी कोणत्या कारणातून या तिघांनी आत्महत्या केली, हे नातेवाइकांचे जबाब घेतल्यानंतरच समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले. तसेच सर्व शक्यता गृहित धरून या प्रकरणाचा सखोल तपास करणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांनी दिली.