शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
संजय राऊतांनी लिहिलेले 'नरकातला स्वर्ग' पुस्तक वसंत मोरेंनी देवाऱ्यात ठेवलं, कारण...
4
IPL 2025: १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीला दाढी-मिशी? व्हायरल झालेल्या फोटोमागचं सत्य काय?
5
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
6
भयंकर! सुनेने रील बनवताच सासरच्या मंडळींना राग अनावर; संतापलेल्या सासऱ्याने फोडलं डोकं
7
मराठी गायकाने नाकारली तुर्कीतील कॉन्सर्टची ऑफर; म्हणाला, "५० लाख देत होते पण..."
8
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
9
ज्योतीची साथीदार, एकत्रच करत होत्या पाकिस्तान वाऱ्या; कोण आहे प्रियंका सेनापती?
10
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
11
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
12
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
13
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
14
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
15
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
17
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
18
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
19
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
20
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल

मुलांच्या काळजीनं पालकांच्या शाळेत चकरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2015 21:50 IST

खंडाळा तालुका : शाळकरी मुलांमध्येही अफवांची भीती; सोशलमिडियाचा वापर जपून करण्याच्या पोलिसांच्या सूचना फेकूगिरीची ‘सोशल’ कथा

दशरथ ननावरे- खंडाळाचोर आला... एवढं दोन शब्दांचं वाक्य कानावर पडलं तरी भल्याभल्यांना पळता भुई थोडी होते. खंडाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून गावोगावी चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातायेत. शाळकरी मुलांच्या मनामध्येही चोरांविषयी भीती निर्माण झाली आहे. वाडी-वस्तीवरील शेजारच्या गावात जाणारी शाळकरी मुले जीव मुठीत घेऊन जात आहेत. पालकांनाही काळजी लागून राहिल्याने एरव्ही बोलावल्याशिवाय शाळेत न येणारे पालकही वारंवार शाळेत चकरा मारू लागले आहेत. बाहेरील राज्यातून काही टोळ्या जिल्ह्यात उतरल्या असून त्या तालुक्यात गावोगावी पसरल्या आहेत. अमूक एका गावात जोडप्यांना मारहाण केली, शाळकरी मुलांना पळविले, लूटमार केली. तमूक गावात दोघाचौघांना पकडले आहे. सर्वांनी सावध राहा अशा अफवा पसरल्या आहेत. सोशलमिडियावर या अफवांचा फोटोसह धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे चोरट्यांपेक्षा अफवांचीच भीती अधिक पसरली आहे.तर रानात जाणाऱ्या मजुरांनाही भिती वाटत असल्याने अनेकजण घरीच बसणे पसंद करीत आहेत. गावोगावी रात्रीच्यावेळी तरुणांनी गस्त चालू केली आहे. तालुक्यातील बहुतांशी गावातून मी स्वत: फेरी मारली आहे. चोरांची निव्वळ अफवा आहे. तरुणांनी सावधपणे सोशल मिडियाचा वापर करावा. अफवांवर विश्वास ठेवू नये. रात्रफेरीसाठी पोलिस गाड्या फिरत आहेत. - अशोक शेळके, पोलीस निरीक्षक, खंडाळा चोरांच्या भीतीने मुलांमध्ये घबराट पसरली होती. चर्चेमुळे शाळेतही मुलांमध्ये आपसात अशीच चर्चा होती; परंतु कुठेही असा प्रकार घडला नसल्याचे मुलांना सांगितले आहे. तसेच पालकांनाही सूचित केले आहे. दैनंदिन कामकाज सुरू आहे. - आर. के. जाधव, मुख्याध्यापक रात्री रानमाळावरील शेतात एखादा शेतकरी विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी बॅटरी घेऊन गेला तरी चोर आल्याची खबर गावात पोहचतेय. तरुणांचा जथ्या लगेच माळरानावर पोहोचतोय. चौकाचौकात बुजुर्ग मंडळी गप्पा मारीत घरांची राखण करीत असतानाचे चित्र दिसत आहे.