शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

पांरपरिक नऊवारी होताहेत गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:01 IST

भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. पेहराव तसेच रितीरिवाज जरी भिन्न असले तरी आपल्या संस्कृतीमध्ये अवघ्या महाराष्ट्राची ओळख असलेली मराठी पेहरावामध्ये डोक्यावर

ठळक मुद्दे आजीही सहावारीत; शिऊन तयार मिळणाऱ्या साडीला अधिक पसंती

खटाव : भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. पेहराव तसेच रितीरिवाज जरी भिन्न असले तरी आपल्या संस्कृतीमध्ये अवघ्या महाराष्ट्राची ओळख असलेली मराठी पेहरावामध्ये डोक्यावर फेटासोबत जोडीला नऊवारी साडी पूर्वी घराघरांमध्ये असायची; परंतु आता नऊवारी साडी परिधान करणाºया महिलांची संख्या कमी झाल्याने नऊवारी साडीची नजाकत केवळ समारंभापुरतीच मर्यादित राहिली आहे. आजकाल लग्न समारंभातील एखाद्या कार्यक्रमाचा विशेष पोषाख म्हणून नउवारीला पसंती आली आहे.

पूर्वी नऊवारी साडीतील स्त्री म्हणजे भारदस्त. स्त्री मराठमोळ्या नऊवारी साडीने कायम ठेवली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून कालानरूप या पेहरावात बदल होत गेल्याने नऊवारी साडी नेसलेली स्त्रीच दुर्मीळ झाली आहे. ग्रामीण भागात क्वचित नऊवारी साडी परिधान केलेली स्त्री नजरेस पडते. नऊवारीच्या ऐवजी सहावारीच साडी स्त्रियांना परिधान करण्यास सहज व सोपी वाटत असल्याने त्यालाच अधिक मागणी वाढत आहे.

काळ बदलला तसे प्रत्येक प्रांताचा पोषाख केवळ समारंभासाठी मर्यादित राहिला आहे. घरोघरी नऊवारीत दिसणारी आई आजी सहावरीत दिसू लागली आहे. काळाबरोबरच आता सहावरीची जागा सलवार कुर्त्याने घेतली आहे. त्यामुळे बहुतांश स्त्रिया ज्यामध्ये लहानापासून ज्येष्ठापर्यंत सलवार कुर्त्याचा पेहराव आवडीने घालताना दिसून येतात. त्यामुळे नऊवारी साडी ही केवळ समारंभाची शोभा झाली आहे.

लग्न समारंभातील साखरपुडा, हळदी समारंभ लग्न समारंभ आदीमध्ये नऊवारीला मानाचे स्थान आले आहे. नववधूकडून यापैकी एका विधीसाठी का होईना, हा अस्सल मराठमोळा पोषाख करण्याचा आग्रह केला जातो.पैठणी, पेशवाई साड्यांना अधिक मागणीविविध समारंभासाठी नऊवारीला वाढती मागणी असल्याने त्यामध्ये पैठणी, पेशवाई आदींना अधिक मागणी होत आहे. नऊवारी साडी कशी परिधान करतात, याचे तंत्र माहीत नसल्याने यावर अत्यंत सुंदर शक्कल लढवली गेली आहे. नऊवारी साडी आता तयार शिऊन मिळू लागल्याने आता कासोटा, साडीपासून ब्राह्मणी, कोल्हापुरी तसेच लावणीसाठी लागणारी नऊवारी साडी शिऊन तयार मिळत असल्याने महिलांचा व तरुणींचा ओढा या साडीकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. तरुणींमध्ये तर या साडीचे अधिक आक र्षण पाहावयास मिळते. घरगुती समारंभाबरोबरच कॉलेजमध्ये होणाºया पारंपरिक दिन, स्रेह संमेलन आदी समारंभात जास्त प्राधान्य नऊवारी साडीला देताना पाहावयास मिळते.

टॅग्स :fashionफॅशनSatara areaसातारा परिसर