शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

सातारच्या रंगकर्मींचा असाही ‘समांतर पॅटर्न’

By admin | Updated: October 29, 2015 00:14 IST

रसिकांशी ‘संवाद’ आगळावेगळा : एकांकिकांच्या खुल्या प्रयोगाचे ‘प्रमोशन’ करणार पथनाट्यातून

 सातारा : समांतर रंगभूमी थंडावली, असे बोलले जात असले तरी वेगवेगळे प्रयोग करून नाट्यसंस्कार पुढे नेण्याचे प्रयत्न होतच असतात. मराठी रंगभूमी दिनानिमित्त एकांकिकांचा प्रयोग आयोजित करणाऱ्या ‘संवाद’ या संस्थेनं प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे वळविण्यासाठीही समांतर पॅटर्न शोधून काढला असून, ३५ कलावंत ठिकठिकाणी पथनाट्यं सादर करून या प्रयोगाचं चक्क ‘प्रमोशन’ करणार आहेत. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात समांतर नाट्यपरंपरेने बाळसे धरले होते. नंतर ही परंपरा काहीशी विस्कळीत झाली आहे हे नक्की; पण धडपडणारे रंगकर्मी नवनवीन क्लृप्त्या योजून समांतर नाट्यचळवळीला बळकटी देण्याचे प्रयत्न सातत्याने करताना दिसतात. प्रेक्षक नाट्यगृहापासून दूर गेला की नाटकवाले प्रेक्षकांपासून दूर गेले, हा प्रश्न ‘कोंबडी आधी की अंडे’ या प्रश्नासारखा अंतहीन आहे; मात्र व्यावसायिक नाटकांनाही पूर्वीसारखी गर्दी होत नाही, हे वास्तव आहे. या पार्श्वभूमीवर, सातारची नाट्यपरंपरा अखंडित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्थांमधील ‘संवाद’ हे एक ठळक नाव आहे. पाच नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन. हे औचित्य साधून चार एकांकिकांचा खुला प्रयोग सातारच्या शाहू कला मंदिरात या संस्थेतर्फे केला जाणार आहे. कमी वेळात मोठा आशय घेऊन येणारा एकांकिका हा नाट्यप्रकार केवळ स्पर्धांपुरता मर्यादित राहू नये, तर एकाच वेळी अनेक विषय जाणून घेण्याची संधी प्रेक्षकांनी साधावी, या हेतूनं संस्थेने ‘आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स’, ‘आकडा’, ‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ आणि ‘वुई द पीपल’ या चार एकांकिकांचा प्रयोग आयोजित केला आहे. हौशी रंगकर्मींचा प्रयोग म्हणजे घरोघर जाऊन प्रवेशिका देणं, त्यातून मिळणाऱ्या रकमेतून नेपथ्य, संगीत तयार करणं आणि त्यातून ऊर्जा वाचवून तालमी करणं, हे गृहितच असतं. त्यातून वेळ आणि शक्ती वाचवून हे ३५ कलावंत आता ‘प्रमोशन’साठी थेट रस्त्यावर उतरणार आहेत. (प्रतिनिधी) कलावंत बदलून करणार प्रयोग आठवडाभर पथनाट्ये करणाऱ्या कलावंतांनाच रोजची तालीम आणि नंतर प्रयोग सादर करायचा आहे. मुख्य प्रयोगासाठी आवाजासह शारीरिक क्षमताही टिकून राहणं गरजेचं आहे; त्यामुळं पथनाट्यात दररोज संस्थेचे कलावंत आलटून-पालटून सहभागी होतील. काय असेल पथनाट्यात... टीव्ही चॅनेलच्या धबडग्यात नाटकासारखी रसरशीत कलाकृती पाहणं किती आनंददायी आहे, तीन तासांत एकच नाटक पाहण्याऐवजी चार वेगवेगळे विषय देणाऱ्या चार एकांकिका पाहण्यात काय गंमत आहे, आपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब असणारं समांतर नाटक टिकणं कसं आवश्यक आहे, हे नाटक उभं करणं किती अवघड आहे, याबाबत पथनाट्यांमधून प्रबोधन करण्यात येणार आहे. तसेच सादर होणाऱ्या एकांकिकांचा ‘ट्रेलर’ही दाखविला जाणार आहे.