शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पंकजा मुंडेंना हद्दवाढीचे पत्र

By admin | Updated: January 1, 2016 00:05 IST

उदयनराजेंचा पुढाकार : अंतिम मंजुरीची प्रक्रिया निर्णायक टप्प्यात

सातारा : जिल्हा परिषदेमध्ये गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सातारा नगर पालिकेच्या हद्दवाढीच्या ठरावाला मंजुरी मिळाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी अंतिम मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू केला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना साताऱ्याच्या हद्दवाढीसंदर्भात खासदार उदयनराजे यांनी पत्र दिले आहे. त्यामुळे सातारा शहराचा विस्तार येत्या दोन महिन्यांत होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत साताऱ्याच्या हद्दवाढीचा ठराव दि. २३ डिसेंबरला एकमताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे त्रिशंकू भाग आणि परिसरातील चार ग्रामपंचायती पालिकेमध्ये समाविष्ट होणार असल्याचे स्पष्ट झाले. हा ठराव अंतिम मंजुरीसाठी नगरविकास खात्याकडे पाठविण्यात आला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार ‘साविआ’चे पक्षप्रतोद अ‍ॅड. दत्ता बनकर हे हद्दवाढीचा पाठपुरावा करत आहेत. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना हद्दवाढीसंदर्भात खासदार उदयनराजे यांनी लिहिलेले पत्र घेऊन दोन दिवसांपूर्वी अ‍ॅड. बनकर हे स्वत: मंत्रालयात गेले होते. शहराचा वाढता विस्तार पाहता साताऱ्याच्या हद्दवाढीसाठी तातडीने पावले उचलावीत, असे त्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. ग्रामविकास मंत्र्यांच्या शिफारशीनंतर हद्दवाढीचा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाणार आहे. मुख्यमंत्र्यांची या प्रस्तावावर स्वाक्षरी झाल्यानंतर साताऱ्याच्या हद्दवाढीला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे. सातारची हद्दवाढ व्हावी, यासाठी सर्व यंत्रणा सकारात्मक आहेत. (प्रतिनिधी)सातारा शहरासह परिसरात वसाहतींचा वाढत चाललेला बकालपणा, वाढते अतिक्रमण, कचऱ्यांचे प्रश्न, सांडपाण्याचे अनियोजन, रस्त्यांची दुरवस्था, ओढ्यावर होत असलेले अतिक्रमण यामुळे विकासकामावर परिणाम होत होता. वाढत चाललेल्या वस्तीमुळे भविष्यात खेळांचे मैदान, बागांचे आरक्षण यालाही मर्यादा येत होत्या. तसेच त्रिशंकू भागाचा विकासही होत नव्हता. हद्दवाढीचा मुद्दा समोर येत असल्यामुळे विकासकामांसाठी अडचणी यायच्या. त्यामुळे पालिकेची हद्दवाढ व्हावी, यासाठी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून शासनाकडे प्रस्ताव व पाठपुरावा सुरू आहे. शाहूपुरी, खेड, कोडोली, जकातवाडी, दरे बुद्रुक, विलासपूर यासह शहर परिसरातील त्रिशंकू भागांचाही त्यामध्ये समावेश आहे.