शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

महाबळेश्वरसह पाचगणी हाऊसफुल्ल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 23:09 IST

महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक आल्याने सर्व परिसर गजबजून गेला आहे. महाबळेश्वर मधील विविध पॉर्इंटस्वरही पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. नाताळची सुटी असल्याने लहान मुलांचीही गर्दी दिसून आली. येथील हॉटेल फुल्ल झाली असून, रविवारी पर्यटकांनी नौकाविहार व घोडेसवारीचा आनंद घेतला.महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ ...

महाबळेश्वर : नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वर, पाचगणीमध्ये हजारोंच्या संख्येने पर्यटक आल्याने सर्व परिसर गजबजून गेला आहे. महाबळेश्वरमधील विविध पॉर्इंटस्वरही पर्यटकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. नाताळची सुटी असल्याने लहान मुलांचीही गर्दी दिसून आली. येथील हॉटेल फुल्ल झाली असून, रविवारी पर्यटकांनी नौकाविहार व घोडेसवारीचा आनंद घेतला.महाबळेश्वर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणी वर्षभर पर्यटक येत असतात. आता नववर्षाचे स्वागत करण्यासाठी देश, परेदशातील पर्यटक येथे आले आहेत. रविवारी २०१७ या वर्षातील अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी प्रसिद्ध मुंबई पॉर्इंटवर पर्यटकांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच वेण्णालेक येथेही पर्यटकांनी नौकाविहार करून आनंद घेतला. तसेच येथे आलेले पर्यटक स्ट्रॉबेरी ज्यूस पिताना आईसक्रीम, आईस गोळा खाताना दिसून आले. वेण्णालेक, मुंबई पॉर्इंट या परिसरामध्ये घोडेसवारीचा देखील आनंद पर्यटकांनी लुटला. नववर्षाच्या निमित्ताने काही हॉटेल चालकांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आॅफर ठेवली आहे. ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी कलाकार तसेच उद्योगपती महाबळेश्वरात आले आहेत. नववर्षाच्या निमित्ताने कोणतीही चुकीची घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रत्येक नाक्यावर व बाजार पेठ परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.पोलिसांची नाकाबंदीकास परिसरात थर्टी फस्टचा जल्लोष साजरा करत असताना मादक द्रव्य सेवन करून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सातारा तालुका पोलिसांनी यवतेश्वर या ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची कसून तपासणी केली. तसेच यावेळी काहीजणांवर कारवाईही करण्यात आली.कासवर थर्टी फस्टचा जल्लोष !पेट्री : नाताळची सुटी संपत आल्याने व २०१७ या वर्षाला निरोप देणे आणि थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी राज्यातील हजारो पर्यटकांची कास तलावावर गर्दी झाली होती. यामध्ये बच्चेकंपनीचाही समावेश होता. तसेच जपान, फ्रान्स या देशातीलही काही पर्यटकांनी हजेरी लावली होती.साताºयापासून पश्चिमेस सुमारे २५ किलोमीटर अंतरावर कास पठार आणि तलाव आहे. निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, तसेच निसर्गाचे वरदान असलेल्या कास या ठिकाणी पर्यटकांची सतत वर्दळ असते. थर्टी फस्टच्या पार्श्वभूमीवर बहुसंख्य पर्यटक कुटुंबीयासमवेत आले होते. तसेच तरुणाईनेही कास तलावावर गर्दी केली होती. पार्टीच्या मेजवानीसाठी पर्यटकांकडून असंख्य चुली मांडल्या गेल्या होत्या. या परिसरातील हिरवीगार दाट झाडी, झुडपांचा निवारा घेत पर्यटकांनी भोजनाचा आस्वाद घेतला. कास परिसरात पर्यटनास आलेल्या पर्यटकांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते. यामुळे संपूर्ण तलाव पर्यटकांच्या गर्दीने गजबजून गेला होता. अनेक पर्यटकांनी आपापल्या वाहनांच्या डेकवर नृत्याचा आनंदही घेतला. तसेच ठिकठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर ठेका धरत होती. तर काही ठिकाणी वयोवृद्ध मंडळी आपल्या नातवंडांसमवेत खेळात मग्न झाली होती. बच्चेकंपनीही या पर्यटनस्थळी कुटुंबासमवेत आनंद घेत होती. कित्येक पर्यटक तलावात जलविहाराचा आनंद घेऊन सेल्फी काढताना दिसत होती.