शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पाचगणी येथे तब्बल चारशे फूट दरीत कार कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 00:32 IST

पाचगणी : येथील हरिसॅन फॉली थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री ...

पाचगणी : येथील हरिसॅन फॉली थापा येथून मुंबईतील पर्यटक दाम्पत्याची कार सुमारे चारशे फूट दरीत कोसळल्याची घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. जखमी पतीला बाहेर काढण्यात यश आले असून, पत्नीचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाचगणीतील हरिसॅन फॉली थापा या ठिकाणी फिरावयास मुंबईतील एक दाम्पत्य आले होते. चालकाचा अचानक कारवरील ताबा सुटल्याने कार थाप्यावरील खोल दरीत चारशे फूट कोसळली. या अपघाताची माहिती समजताच महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक कोंडुबैरी व कर्मचारी तसेच पाचगणी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, महाबळेश्वर येथील सह्याद्री ट्रेकर्स, वाई पोलीस असा सारा फौजफाटा घटनास्थळी तत्काळ दाखल झाला. या सर्वांनी मिळून दरीत मदतकार्यास सुरुवात केली. खोल दरीत उतरून उमेद बिलाल खटाव (वय ३५) यांना बाहेर काढण्यात यश आले. खटाव यांना पाचगणीतील बेल एअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर पत्नी सना उमेद खटाव (वय ३२) यांना दरीतून शोधण्याची मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती. महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील तसेच महसूल विभागातील सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अत्यंत अवघड अशी दरी असल्यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.