शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पाचवडमध्ये जातपंचायतीला मूठमाती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2016 00:48 IST

यापुढे पोलिसांत मागणार दाद : गोपाळ समाजाचा परिवर्तनाचा निर्णय

राहुल तांबोळी - भुर्इंज ‘यापुढे जातपंचायतीत नव्हे तर थेट पोलीस ठाण्यातच दाद मागायची,’ असा महत्त्वपूर्ण निर्णय पाचवड येथील गोपाळ समाज बांधवांनी शनिवारी एकमताने घेऊन ‘जातपंचायतीला मूठमाती’ देण्याचा निर्धार केला. पाचवड येथे शनिवारी झालेल्या गोपाळ समाजाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सामाजिक सुधारणेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. दरम्यान, गुरुवारी ज्या ठिकाणी हा अघोरी प्रकार घडला, त्याच जागेत परिवर्तनाचा निर्णय घेतला. पाचवड येथील गोपाळ समाजातील जातपंचायतीत बाप-लेकीला सुनावण्यात आलेल्या शिक्षेनंतर पोलिसांनी १२ तासांनंतर गुन्हा दाखल करून संबंधितांना अटक केली. या घटनेवर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसेच विविध संघटनांनी आवाज उठवून जातपंचायतीची अनिष्ट प्रथा बंद करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर कोणी सांगण्यापूर्वीच या वस्तीतील बांधवांनी एकत्र येऊन यापुढे काही घडले तर जातपंचायतीत नाही तर पोलीस ठाण्यात दाद मागणार असल्याचे सांगितले. पाचवडच्या गोपाळ समाजात शनिवारीही भीतीचे वातावरण होते. या वस्तीतील पुरुष बँड पथकात वाजविण्याचे काम करून आपले पोट भरतात. सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने अनेकजण बँड वाजविण्यासाठी बाहेर गेले होते; मात्र दोन दिवस झालेल्या त्रासामुळे या सर्वांनीच जातपंचायतीबाबत विचार करण्यास शुक़्रवारपासून सुरुवात केली. ज्या ठिकाणी गुरुवारी जातपंचायत भरली होती, त्याच ठिकाणी एकत्र येऊन जातपंचायतीला मूठमाती देण्याचा निर्णय घेतला. ‘भाऊ लई तरास झाला बघ, पोलिसांनी माणसं धरून नेल्याती. वाजवाय गेल्याशिवाय पोटाला मिळत नाय. जे पहिल्यापासून चालत आलं होतं तेच आजपतुर पुढं चालत होतं. हे चुकीचं हाय असं कुणीबी सांगाय कधी आलं नाय; पण आता हे चुकीचं असल्याचं समजू लागलंय. यापुढं असलं काय आमच्या इथं होणार नाय. जे काय असंल ते पोलिसांकडं दाद मागू; पण जातपंचायतीकडं कधीच जाणार नाय बघा,’ अशीच प्रतिक्रिया यावेळी गोपाळ बांधवांनी दिली. यावेळी सोना पवार, वसंत जाधव, संजय जाधव, गणेश पवार, प्रकाश पवार, अरुण जाधव, सागर पवार, दिलीप पवार, सचिन जाधव, सायबू जाधव, दत्तू जाधव, संतोष चव्हाण, आदी उपस्थित होते. यावेळी वस्तीत अनेक महिलांही होत्या; मात्र त्या झोपडीतून बाहेर आल्या नाहीत. झालेला निर्णय या सर्वांनी जेंव्हा महिलांना सांगितला तेव्हा त्यांनीही ‘यापुढं असलं काय नकोच,’ असे सांगून या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला. (प्रतिनिधी)