शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या युवकाची पाचगणीत आत्महत्या

By admin | Updated: July 12, 2015 21:34 IST

शेतात विषप्राशन : सडलेल्या अवस्थेत पांगारी ग्रामस्थांना आढळला मृतदेह

भिलार : पाचगणी-महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर असणाऱ्या भिलार वॉटर फॉलजवळ एका युवकांने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.संग्राम सुरेश गरूड (वय, २०, रा. बेलसर, ता. पुंरदर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पाचगणी पोलीस ठाणे व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पांगारी हद्दीत येणाऱ्या भिलार वॉटर फॉलच्या समोरील बाजूस डोंगराळ भागात राजाराम धोडींराम भिलारे यांच्या ‘पडान’ या शेतात एका युवकाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती भिलारचे पोलीस पाटील गणपत महादेव भिलारे यांनी पाचगणी पोलीस ठाण्याला दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. संबंधित मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता. पोलिसांना मृतदेहाशेजारी विषारी औषधाच्या बाटल्या व एक बॅग सापडली. बॅगेत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे संबंधित मृतदेह संग्राम गरूड नावाच्या युवकाचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे याच्या मार्गदर्शनखाली पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)कारण अस्पष्टसंग्राम हा वडगाव बुद्रुक (पुणे) येथील वेणुताई चव्हाण पॉलिटेक्निक येथे शेवटच्या वर्षाला शिकत होता. तो परीक्षेत नापास झाला होता. कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार संग्रामवर मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार सुरू होते. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्या स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.