शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

पंचायत समितीचा एक दिवस स्वच्छतेसाठी

By admin | Updated: June 9, 2015 00:11 IST

सचिन घाडगे यांचा संकल्प : दर शनिवारी दोन तास होणार स्वच्छता

परळी : सातारा पंचायत समितीमध्ये नव्याने रूजू झालेले गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या संकल्पनेतून तसेच सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ यांच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी साडेदहा ते साडेबारा अशी दीड तास पंचायत समितीच्या सर्व दालनांसह परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी पंचायत समितीही सरसावली आहे. तत्पूर्वी विस्तार अधिकारी सचिन घाडगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. यावेळी सर्वांनी दर शनिवारी दोन तास पंचायत समितीत स्वेच्छेने स्वच्छता मोहीम हाती घेण्याचा निर्धार केला.अधिकारी व कर्मचाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कारभारामध्ये सुसूत्रता, वेळेचे पालन, सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात या त्रिसूत्रीबरोबरच आपले कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवण्याचा कानमंत्र दिला होता. ही बैठक झाल्यानंतर दोनच दिवसांनंतर शनिवारी सकाळी साडेदहा वाजता गटविकास अधिकारी सचिन घाडगे, सभापती कविता चव्हाण, उपसभापती सूर्यकांत पडवळ यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला. पंचायत समितीमधील आरोग्य विभाग, शिक्षण, बांधकाम, पशुसंवर्धन, सर्व शिक्षा अभियान, शालेय पोषण, एनआरएचएम या विभागांसह सभापती, उपसभापती आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाची स्वच्छता करण्यात आली. या मोहिमेत सर्व अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)जोडीने स्वच्छता मोहीम सभापती कविता चव्हाण या पंचायत समितीचा परिसर स्वच्छ करीत असताना त्यांचे पती व नेसघरचे सरपंच जयराम चव्हण हे तेथे आले असता सर्व लोक स्वच्छता करताहेत हे पाहून त्यांनीही त्यांच्या पत्नीसमवेत हातात झाडू घेऊन स्वच्छता करण्यास सुरुवात केली.दारूंच्या बाटल्यांचा ढीगअधिकारी, पदाधिकारी स्वच्छता करीत असताना त्यांना मोकळ्या दारूच्या बाटल्या आणि कोंबडीच्या पिसांचा खच पंचायत समितीच्या परिसरात आढळून आला. त्यामुळे रात्रीच्या सुमारास बाहेरील काही अपप्रवृत्त्या त्या ठिकाणी ‘ओल्या पार्ट्या’करीत असावेत, अशी शक्यता काहीनी व्यक्त केली आहे.