शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्याला मारहाण

By admin | Updated: May 21, 2014 17:37 IST

कार पायाला घासल्याचे निमित्त : पोलीस ठाण्यासमोरील राडा ‘सीसीटीव्ही’त कैद

 सातारा : सातारा पंचायत समितीच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे राहिलेल्या उमेदवारांची एका लग्न समारंभात वादावादी झाली. याची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या पंचायत समिती सदस्य आणि त्यांचा प्रतिस्पर्धी यांच्यात ठाण्यासमोरच पुन्हा मारामारी झाली. हा राडा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या ‘सीसीटीव्ही’त कैद झाला. ही खळबळजनक घटना आज, मंगळवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास घडली. सातारा पंचायत समितीच्या निवडणुकीत राहुल शिंदे हे अपक्ष म्हणून उभे राहिले होते, तर त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे रणजित माने त्यांच्याविरोधात उभे राहिले होते. या निवडणुकीत शिंदे विजयी झाले होते. त्यामुळे या दोघांमध्ये पूर्वीपासूनच राजकीय वाद आहेत. दरम्यान, आज पाटखळ माथ्यावरील एका लग्न समारंभात शिंदे आणि माने यांना निमंत्रण होते. या लग्न समारंभाला राहुल शिंदे पहिल्यांदा पोहोचले होते. लग्नाच्या मुहूर्ताला अर्धा तास बाकी होता. त्यामुळे ते रस्त्याच्या शेजारी कार्यकर्त्यांशी गप्पा मारत उभे राहिले होते. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार रणजित माने कारमधून लग्न समारंभासाठी येत होते. त्यावेळी कारचे फूटरेस्ट शिंदे यांच्या पायाला लागले. त्यामुळे दोघांची बाचाबाची झाली. हा वाद तेथे उपस्थित असणार्‍या कार्यकर्त्यांनी सोडविला. मात्र, लग्नसमारंभ पार पडल्यानंतर शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी रणजित माने यांना मारहाण केली. त्यांच्या डोक्याला जखम झाली. अशा अवस्थेत ते कुटुुंबासह शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले. त्यांच्यापाठोपाठ राहुल शिंदेही आले. त्यावेळी रणजित माने यांचा भाऊ अजित माने यांनी धावत जाऊन शिंदे यांच्या शर्टाची कॉलर पकडली आणि त्यांच्या कानशिलात लगावली. हा प्रकार सुरू असताना तेथे शिंदे यांचे समर्थक आले. त्यांनीही अजित माने यांना मारहाण केली. शहर पोलीस ठाण्यासमोरच दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलीस ठाण्यातून धावत येऊन पोलिसांनी कार्यकर्त्यांना हटकले आणि राहुल शिंदे आणि रणजित माने यांच्यासह अन्य काहीजणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची शहर पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)