शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पॅनला मिळेना आधार!

By admin | Updated: July 1, 2017 12:35 IST

अनेक ग्राहक चिंतेत : आयकर विभागाच्यावेबसाईटवर जोडण्याची प्रक्रिया होईना

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. 0१ : आयकर विभागातर्फे देण्यात आलेल्या पॅन कार्डला आधार कार्ड क्रमांक जोडण्याबाबत सोशल मिडियावरुन माहिती फिरत आहे. ३0 जून ही अखेरची तारीख असल्याचे सांगितले जात असल्याने शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी लोकांनी आयकर विभागाची वेबसाईट उघडून त्यावर पॅनकार्डला आधार कार्ड क्रमांक जोडण्याचा करण्याचा प्रयत्न केला; परंतु अनेकांचा भ्रमनिरास झाला. विशेष म्हणजे हाच अनुभव १ जुलै रोजीही अनेकांना आला.बोगस पॅन नेटवर्कला प्रतिबंध घालण्यासाठी भारत सरकारने पॅनला आधार क्रमांक जोडण्याचा निर्णय घेतला आहे, ३0 जूनच्या आत सर्व पॅन क्रमांक आधार क्रमांक जोडणे अनिवार्य आहे, अन्यथा पॅन क्रमांक बंद होईल, पॅन बंद होण्यापासून वाचविण्यासाठी आजच जोडा, पॅनला आधार क्रमांक जोडणे अतिशय सोपे आहे, अशा सूचना सोशल मिडियाच्या माध्यमातून फिरत आहेत. पॅनला आधार क्रमांक जोडण्यासाठी ज्या पायऱ्या आहेत, त्याचा व्हिडिओ ज्या लिंकवर आहे, तोही दाखविला जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक पॅनधारकांनी आयकर विभागाचे संकेतस्थळ उघडून त्यावर आधार क्रमांक पॅनकार्डशी जोडण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यामध्ये जाहीरातीच जास्त पाहायला मिळाल्या. जो अर्ज दिला आहे, त्यात माहिती भरण्यासाठी कर्सरही घेतला जात नाही, हे लक्षात आल्याने अनेकांचा भ्रमनिरास झाला. दरम्यान, आधार कार्ड क्रमांक पॅनकार्डशी जोडला गेला नसल्याने पॅनकार्ड बंद पडण्याच्या भीतीने अनेकांची गाळण उडाली. ज्यांनी पॅनकार्डशी आधारकार्ड जोडले नाही, त्यांचे १ जुलैनंतर पॅनकार्ड बंद होणार, अशी चर्चा पॅनधारकांमध्ये सध्या सुरु आहे.

पुणे कार्यालयाशी संपर्क साधा

पॅनकार्ड आधारकार्डशी जोडण्याबाबत येथील आयकर विभागाशी संपर्क साधला असता तेथील कर्मचाऱ्याने पुणे येथील वरिष्ठांकडून माहिती घ्या, आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही, असे सांगितले. आयकर विवरण पत्र भरण्यासाठी यापुढे आधार आणि पॅन क्रमांकाच्या लिंकची गरज भासणार आहे. तांत्रिक कारणांअभावी ३० जूनच्या आत ही लिंक जोडता आली नाही तरी नागरिकांनी चिंता करू नये. ही लिंक कधीही जोडली तरी चालू शकते. - सुरेशचंद्र कटारिया, चार्टेड अकाउंटट