शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पाटणमध्ये लग्नसराईत ५० लाखांना गंडा मून होम निड्सचा मालक पसार

By admin | Updated: May 18, 2014 00:10 IST

पाटण : मून होम निड्स दुकानाच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात टीव्ही, मोबाइल, फ्रीज, कपाट अशा संसारोपयोगी साहित्य देण्याचे आमिष

पाटण : मून होम निड्स दुकानाच्या माध्यमातून ५० टक्के सवलतीच्या दरात टीव्ही, मोबाइल, फ्रीज, कपाट अशा संसारोपयोगी साहित्य देण्याचे आमिष दाखवलेली व्यक्ती पसार झाली आहे. यामुळे सुमारे ५०० लोकांची फसवणूक झाली असून, त्याने ५० लाखांचा गंडा घातल्याची चर्चा सुरू आहे. ऐन लग्नसराईतच ही घटना घडल्याने बंद असणार्‍या दुकानासमोर ग्राहकांची एकच गर्दी झाली होती. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी पाटण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मोहंमद गणी मोहंमद सुलेमान या नावाच्या व्यक्तीने पाटणजवळ दि. २४ एप्रिल रोजी संसारोपयोगी साहित्य मिळण्याचे दुकान थाटले होते. मून होम निड्स असे नाव असलेल्या या दुकानात ५० टक्के सवलतीच्या दरात बुकिंगनंतर १० दिवसांच्या आत साहित्य मिळणार होते. त्यामध्ये टीव्ही, फ्रीज, मोबाइल, कपाट, इस्त्री व इतर संसारोपयोगी साहित्याचा समावेश होता. प्रथम काहीनी या योजनेचा लाभ घेतला. त्यामुळे त्यांनतर अनेकांनी पाच हजारांपासून ५० हजारांपर्यंत रक्कम जमा केली. मात्र, शुक्रवार, दि. १६ रोजी सुलेमान दुकान बंद करून पसार झाला. शनिवारी सकाळी हे दुकान बंद असल्याचे पाहून लोकांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर सर्वत्रच खळबळ उडाली. याबाबत कांचन जगन्नाथ पाटील (रा. चाफळ, ता. पाटण) यांनी पाटण पोलिसांत तक्रार दिली आहे. (प्रतिनिधी)