शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

जीवघेण्या हत्याराचा मालकही रडारवर !

By admin | Updated: August 20, 2016 22:53 IST

अन्न व औषध प्रशासनाचे काम : पोळच्या हाती स्कोलीन आले कुठून याचाही शोध होणार--कोल्ड ब्लडेड सिरियल किलर!

राहुल तांबोळी --भुर्इंज --कोल्ड ब्लडेड सिरियल किलर संतोष पोळ याने खून करण्यासाठी जे हत्यार वापरले त्याचा मालक कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे. खुनासाठी हत्यार म्हणून वापरलेले ‘स्कोलीन’ हे भुलीचे औषध तसे सहजासहजी कोणालाही उपलब्ध होत नाही. त्यामुळे खुनासाठी त्याने वापरलेले ‘स्कोलीन’चे हे हत्यार त्याला कोणी दिले? कोणत्या निकषांवर आणि कोणत्या कारणासाठी दिले? या हत्याराचा खरा मालक कोण? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून, त्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनालाही आपली भूमिका पार पाडावी लागणार आहे. इतर कुठल्याही गुन्ह्णात ज्या हत्याराचा वापर केला जातो त्या हत्याराचा मालक, ते हत्यार कोठून उपलब्ध केले अथवा कोणाकडून खरेदी केले याचा शोध पोलिसांकडून घेतला जाऊन संबंधितांवर कारवाई केली जाते. क्रूरकर्मा संतोष पोळने सहापैकी पाच खुनांमध्ये भुलीच्या औषधाचा वापर करून ते औषध इंजेक्शनद्वारे दिल्याचे तपासात सामोरे येत आहे. त्या अर्थाने खून करणाऱ्यासाठी ‘स्कोलीन’ हेच भुलीचे औषध त्याचे हत्यार ठरले असून, त्या हत्याराची उपलब्धी कशी, कधी, कोठून आणि कोणाकडून झाली, हे प्रश्न आता निर्माण झाले आहेत. वैद्यकीय व औषध क्षेत्रातील जाणकारांकडून माहिती घेतली असता समजले की, मुळातच ‘स्कोलीन’ हे भुलीचे औषध ग्रामीण भागातील कोणत्याही मेडिकलमध्ये मिळतच नाही. भूलतज्ज्ञ असतील अशाच ठिकाणच्या अगदी मोजक्या मेडिकलमध्ये ‘स्कोलीन’ विक्रीसाठी उपलब्ध असते. तसे असले तरी हे ‘स्कोलीन’ विकण्याबाबत मेडिकल व्यावसायिकांसाठी काटेकोर नियम आहेत. त्या नियमांचे उल्लंघन झाले तर अन्न व औषध विभाग संबंधित मेडिकलचा व्यवसाय परवाना रद्द करू शकते. त्यामुळे अधिकृत आणि योग्य पदवी धारण केलेल्या भूलतज्ज्ञाची सहीनिशी चिठ्ठी असेल तरच भुलीचे औषध देण्याचा नियम व बंधन विक्रेत्यांवर आहे. केवळ सहीनिशी अशी चिठ्ठी असून उपयोग नाही, तर त्या चिठ्ठीची व त्यातील सहीची खात्री करून घेऊनच भुलीचे औषध विकण्याचे बंधन विक्रेत्यांवर आहे. उगाच डोकेदुखीची किंवा अ‍ॅसिडीटीच्या गोळ्यांसारखे भुलीचे औषध कुठेही आणि कुणालाही मिळत नाही. त्यामुळे संतोषकडे ते आले कुठून? हा प्रश्न कारवाईत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.एखाद्या व्यक्तीकडूनच काय पण डॉक्टरकडून जरी भुलीच्या औषधाचा गैरवापर झाला तरीही त्या डॉक्टरवर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल होतो. शस्त्रक्रिया करताना काहीवेळा भुलीच्या औषधाचा जादा डोस दिल्या गेल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडल्या असून, अशा घटनांमध्ये अशा भूलतज्ज्ञ डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्याचे खटले सुरू आहेत. या खून मालिकेच्या घटनेत तर क्रूरकर्मा संतोष पोळने अगदी जाणीवपूर्वक भुलीच्या औषधाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. एका कंपनीच्या भुलीचे औषध ‘स्कोलीन’ या नावाने विकले जाते. या औषधाच्या २ मिली बाटलीची किंमत सुमारे १० रुपये आहे. तर इतर कंपनीच्या वेगळ्या नावाने असणाऱ्या भुलीच्या औषधांच्या बाटल्या अगदी १० मिलीपर्यंत आहेत. अगदी एखाद्याला ठार मारायचेच आहे, या उद्देशाने जर भुलीच्या औषधाचा डोस द्यायचा एखाद्याने ठरवले तर यातील जाणकार त्याचा मोठा वापर करणार, हे निश्चित. त्यामुळेच या खून मालिकेत मोठ्या प्रमाणावर भुलीच्या औषधाचा वापर झाला असल्याची शक्यता, तज्ज्ञांनी व्यक्त केली. भुलीच्या औषधाचे हत्यार संतोषला सहज उपलब्ध कसे झाले? संतोष पोळ याच्या कारनाम्यांची व्याप्ती वाढतच जाणार की काय? अशी शंका असताना संतोष पोळने खुनांसाठी वापरलेले हे भुलीच्या औषधाचे हत्यार त्याच्या हातात आले कुठून? हा प्रश्न आता निर्माण झाला असून, या हत्याराचा मेडिकल ते संतोष पोळ असा झालेला प्रवास व्हाया कुठून? हे शोधून काढण्याचे काम करावे लागणार आहे. विशिष्ट परवान्याची गरजभुलीचे औषध विक्रीसाठी आणि बाळगण्यासाठी विशिष्ट्य परवान्याची गरज असते. त्या परवान्याअभावी ते औषध बाळगणे बेकायदेशीर आहे. या किचकिटीमुळे आणि खूपच कमी किमतीमुळे मेडिकल व्यावसायिकही भुलीचे औषध विक्रीसाठी ठेवत नाहीत. भूलतज्ज्ञ डॉक्टरलाच हे औषध विक्री करण्याचा नियम असून, अशा डॉक्टर व मोठ्या रुग्णालयांकडूनच भुलीचे औषध नियमाप्रमाणे बाळगले जाते. या सर्व किचकट बाबीमुळे संतोष पोळला नेमके कोठे हे भुलीचे औषध उपलब्ध होत होते? या प्रश्न उपस्थित होत आहे.