शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !

By admin | Updated: July 14, 2017 23:03 IST

चौकी नावाला; कर्मचारी मिळेना गावाला !

माणिक डोंगरे । लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : आगाशिवनगरला पोलिस चौकीचे स्थलांतर झाल्यापासून कायमच कुलपात बंद असते. मलकापूर शहारासाठी मंजूर असलेल्या पोलिस ठाण्यासाठी पुरेसे कर्मचारी नसल्यामुळे स्वतंत्र पोलिस ठाण्याचे भिजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे चाळीस हजारांवर लोकसंख्येच्या गस्तीसाठी दोन बिटमध्ये चारच कर्मचारी गस्त घालत असून, शहराची सुरक्षितता सध्या रामभरोसे आहे. याचा परिणाम म्हणून शहरात दिवसेंदिवस गुंडगिरी व बेकायदा व्यवसायांना ऊत आला आहे. मलकापूर शहराची गेली दहा वर्षांत झपाट्याने वाढ झाली. २००८ मध्ये नगरपंचायत झाल्यापासून शहरात राहणाऱ्यांचा लोंढा वाढल्यामुळे शहराची लोकसंख्याही दुप्पट झाली आहे. ती आज ३२ हजारांवर गेली आहे. ज्या पद्धतीने शहरातील शैक्षणिक, विकासातील गुणात्मक व संख्यात्मक वाढ झाली तशीच या शहरातील पाठीमागील तुलनेत गुन्हेगारीचे प्रमाणही वाढले आहे. दिवसेंदिवस शहरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडण्यात भरच पडत आहे. बेकायदेशीर व्यवसायाने आपली पाळेमुळे घट्ट करण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील अशांतता बिघडत असल्यामुळे तत्कालीन स्थानिक प्रशासनाने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडे शहरासाठी स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली. शहरात घडणाऱ्या घटना विचारात घेता शासन स्तरावरून मलकापूर शहरासाठी पोलिस चौकी मंजूर केली. नगरपंचायत कार्यालयासमोरील इमारत भाडेतत्त्वावर घेऊन या चौकीचे अधिकारी व नेत्यांच्या हस्ते थाटात प्रारंभही करण्यात आला. जेमतेम निवडणुकीचा कालावधी वगळता हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या दिवसच ही चौकी उघडली जाते. धूळ झटकून स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन व १ मे रोजी येथे ध्वजारोहन करण्यात येते. उर्वरित कालावधीत या चौकीतील टेबलावरचा धुळीचा थर वाढतच गेला. शहरातील वाढती गुन्हेगारी विचारात घेता पुन्हा स्थानिक प्रशासनाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या सहकार्याने मलकापूर शहरासाठी २०१४ मध्ये स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करून घेतले. २१ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याचा व इमारतीचा आराखडाही तयार झाला. मात्र, तीन वर्षांत काहीच कार्यवाही झाली नाही. मलकापुरातील पोलिस चौकीचे आठ वर्षांनंतर सहा महिन्यांपूर्वी आगाशिवनगरात स्थलांतर करण्यात आले. आगाशिवनगरातही उद्घाटनानंतरही पोलिस चौकी सहा महिन्यांपासून कुलपातच बंद आहे. पोलिसांनी कामकाजासाठी एकदाही या चौकीचा वापर केलेला नाही. मलकापूरसह आसपासच्या गावातील सुमारे चाळीस ते पन्नास हजारांवर लोकसंख्येच्या परिसरात केवळ चार ते सहाच पोलिस कर्मचारी गस्त घालत असतात. अशा अपुऱ्या पोलिस फौजफाट्यामुळे क्राईमरेट दिवसेंदिवस वाढत आहे.