शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

वाळवा तालुक्यात खिचडी राजकारणाचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2015 22:02 IST

पॅनेलप्रमुखांच्यावर वैयक्तिक टीका

अशोक पाटील =- इस्लामपूर -वाळवा तालुक्यातील १४ गावांत कृष्णा सह. साखर कारखान्याचे ५00 पेक्षा जास्त सभासद आहेत. यापैकी ६ गावात तिन्ही पॅनेलप्रमुखांनी उमेदवार दिला आहे. त्यामुळे ही गावे संवेदनशील बनली आहेत. उर्वरित सर्व कृष्णा खोऱ्यातील गावात पॅनेलप्रमुखांच्या चारित्र्यापासून त्यांच्या राजकीय वाटचालीच्या सर्व कुंडल्या मांडल्या जात आहेत. या निवडणुकीत जवळजवळ राष्ट्रवादीचेच उमेदरवार एकमेकांविरोधात उभे असल्याने वाळवा तालुक्यात राजकीय खिचडी झाली आहे.वाळवा तालुक्यातील तांबवे येथे १३३०, नेर्ले १५५१, बोरगाव ८०८, इस्लामपूर ७१९, रेठरेहरणाक्ष ११६४, येडेमच्छिंद्र ९४२ अशी सभासदांची संख्या आहे. ही गावे पॅनेलप्रमुखांनी टार्गेट केली आहेत. या गावात तिन्ही पॅनेलकडून उमेदवार देण्यात आले आहेत. बोरगाव येथील जितेंद्र पाटील वगळता हे सर्व उमेदवार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. कृष्णाच्या निवडणुकीत हे कार्यकर्ते एकमेकांविरोधात ठाकले आहेत. याव्यतिरिक्त नरसिंहपूर ५४४, पेठ ७९०, कामेरी ७२४, कासेगाव ७००, भवानीनगर ५७३, शिरटे ६३३ अशी सभासदांची संख्या आहे. परंतु या गावात उमेदवारी देण्यात आलेली नाही. तरीसुध्दा या गावातून प्रचाराला वेग आला आहे.संस्थापक पॅनेलचे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते, रयत पॅनेलचे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते, मदन मोहिते आणि सहकार पॅनेलचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या राजकीय कारकीर्दीचे आणि वैयक्तिक पातळीवरील मोजमाप सर्वच सभासदांतून केले जात आहे. अविनाश मोहिते वगळता या इतरांनी कृष्णावर १५ ते २0 वर्षे सत्ता भोगली आहे. त्यांनी या काळात सभासदांना नेमके काय दिले यावरही मंथन सुरू आहे, तर अविनाश मोहिते यांनी पाच वर्षात सभासदांसाठी काय केले, याचीही दखल घेतली जात आहे. या चर्चेतून तिन्ही पॅनेलप्रमुखांचे पारडे कमी-जास्त होत आहे.प्रचार सभेतून कृष्णा कारखान्याची लक्तरे तोडली जात आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. परंतु मतदान कसे करावे, याबाबत कोणीही मार्गदर्शन करत नाही. अनेक सभासदांचा समज फक्त तीनच मते द्यायची आहेत, असा झाला आहे. वास्तविक प्रत्येक सभासदाला २१ उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे, याची माहिती सभासदांना देणे गरजेचे आहे.