शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गुंडगिरी मोडून काढणे ही आमची परंपरा

By admin | Updated: November 16, 2016 23:01 IST

उदयनराजे भोसले : आदरयुक्त दहशतीबद्दल समाज सांगेल ते प्रायश्चित्त घेण्यास तयार

सातारा : सातारा शहरात असलेली गुंडगिरी मोडून काढण्याची आणि सुशासन राखणे ही आमच्या कुटुंबाची परंपरा आहे.आमच्या आदरयुक्त दहशतीबद्दल, समाज सांगेल ते प्रायश्चित्त आम्ही घेण्यास केव्हाही तयार आहोत. आमचे विरोधक मात्र आमच्या नैतिक वचकाची धडकी घेवून गर्भगळीत झाले आहेत. उसनं अवसान आणुन, कथित दहशत संपवण्याचा, न वाजणारा ढोल उर फाटेपर्यंत बडवत आहेत. असा घणाघात खासदार उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर केला. सातारा विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माधवी संजोग कदम आणि प्रभाग क्रमांक १० मधील साविआचे मनोज शेंडे, संगिता आवळे या उमेदवारांच्या प्रचार प्बैठकीत नागरिकांशी सुसंवाद साधताना उदयनराजे बोलत होते. ते म्हणाले, ‘सर्वसामान्य रिक्शावाले आणि नागरीक यांना तत्कालीन होणाऱ्या दंडेलशाहीच्या त्रासापासून सुटका करणारे फक्त एकच व्यक्तीमत्व म्हणजे दिवंगत दादामहाराज उर्फ प्रतापसिंहमहाराज हेच होते. त्यांच्या पश्चात गल्लोगल्लीच्या तथाकथित दंगेखोरांवर आमचा नैतिक वचक समाजावर अन्याय होवू नये म्हणून कायम राहीला आहे आणि यापुढेही राहणार आहे. कोणत्याही निवडणुकीत, प्रचारात कोणताही विधायक मु्द्या नसला की आमची दहशत आहे हा हमखास राखुन ठेवलेला मुद्दा बाहेर काढला जातो. त्यामुळे दहशत हा शब्दच सातारा जिल्ह्यात बोथट झाला आहे. आमची जर दहशत असती तर आम्ही खुलेआम जनतेमध्ये मिसळलो नसतो. कायम स्वत:ला स्वसंरक्षणात ठेवून बाउंसर घेवून वावरलो असतो. दहशतवाद करणाऱ्यास अनेक शत्रु तयार होत असतात आणि दहशतीखाली केलेल्या अन्यायामुळे समाजात अशा व्यक्तीविषयी चीड असते. आम्ही मात्र केव्हाही, कधीही आणि कुठेही जाण्यास तयार असतो. नागरीकांच्या मदतीला धावून जात असतो, असे धावून जाणे हीच जर दहशत असेल तर ती दहशतीची संकल्पना आम्हाला मान्य आहे. याउलट आम्ही भ्रष्टपणा कधीच केला नाही, भ्रष्टाचार करण्याची संधी सुध्दा मिळु नये म्हणून आमच्या स्वत:च्या सहभागाने कधीही सहकारी संस्था काढल्या नाहीत. मात्र, त्याचबरोबर अनेक संस्थांमध्ये आमचे नेतृत्व आहे. अनेक संस्थांच्या निर्मितीमध्ये आमचे योगदान आहे. अनेक संस्थांना आम्ही आमच्या पध्दतीने लागेल ते सहकार्य करीत असतो. मात्र संस्था काढायच्या त्या माध्यमातुन निधी उभारायचा, सरकारी अनुदाने घ्यायची, पुन्हा संस्था डबघाईला आली म्हणून ती मोडीत काढून त्या संस्थेचा हवातसा वापर करायचा हे आमच्या नैतिकतेमध्ये बसत नाही. अशा संस्थांमध्ये असलेल्या कामगार वर्गास किती पगार दिला जातो हा एक संशोधनाचा विषय आहे. असेही खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. (प्रतिनिधी)