शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आमची पळण्याची हौस फिटली: उदयनराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2019 23:30 IST

सातारा : जेव्हा दोन्ही राजे एकमेकांना भेटले होते. तेव्हा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा शिवेंद्रसिंहराजेंनी याबाबत विचारल्यावर ...

सातारा : जेव्हा दोन्ही राजे एकमेकांना भेटले होते. तेव्हा उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंच्या खांद्यावर हात ठेवला होता. तेव्हा शिवेंद्रसिंहराजेंनी याबाबत विचारल्यावर ‘फिटनेस चेक करतोय असे उत्तर उदयनराजेंनी दिले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रविवारी यवतेश्वर घाटात हे दोघे आमने-सामने आले. यावेळी खासदार उदयनराजे यांनी ‘तुम्ही एवढं पळवले की दोघांची पळण्याची आता हाऊसच फिटली,’ अशी मार्मिक टिप्पणी केली.दरम्यान, दोन्ही राजेंनी हातात हात घालून ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची खूण दाखवून आम्ही दोघं पुन्हा एकत्र येऊ शकतो, असेच सूचित केले. यानिमित्ताने खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील विरोध निवडणुकीच्या तोंडावर मावळत चालला असून, गेल्या दोन दिवसांत तीन कार्यक्रमांच्या निमित्ताने दोघे एकत्र आल्याचे दिसले. तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमासाठी आल्यानंतर एका गाडीतूनच पवार, उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे आले. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनीच त्या गाडीचे सारथ्य केले.खासदार उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांत दुरावा निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत होते. अनेक आमदारांनी त्यांच्याविरोधात शरद पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर तर खासदार उदयनराजे भोसले मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या मंत्र्यांचीही भेट घेताना दिसले. त्यामुळे उदयनराजेंच्या मनात नक्की काय चालले आहे तेच कळत नव्हते. त्यातच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे काही कार्यक्रमाच्या ठिकाणी समोरासमोर आले. त्यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंहराजेंचा खांदा दाबल्याची घटना घडली. यामुळे दोघांचे सूर जुळत असल्याचे समोर आले होते.सातारकरांसाठी हे शुभसंकेतच होते. असे असतानाच शनिवारी एका खासगी कार्यक्रमासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. त्यांनी खासदार उदयनराजे, आमदार शिवेद्रसिंहराजे आणि आमदार शशिकांत शिंदे यांना एकाच गाडीमध्ये घेतले. विशेष म्हणजे यावेळी चक्क शिवेंद्रसिंहराजे यांनी गाडीचे सारथ्य केल्याचे सातारकरांनी पाहिले.यवतेश्वर घाटात आमने-सामने.शरद पवार यांच्याबरोबर शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे होते. त्यानंतर सायंकाळी साताºयात एका ठिकाणी उद्घाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी दोघे राजे एकत्र दिसून आले. त्याचबरोबर रविवारी तर शहराजवळील यवतेश्वर घाटात दोघे एकत्र आले. रनिंग स्पर्धेचे निमित्त त्यासाठी कारणीभूत ठरले. त्यावेळी दोघांनीही व्ही फॉर व्हिक्टरीची खून करून दाखविली. हे मनोमिलनाकडे जाण्याचेच संकेत ठरत आहेत.