शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

...अन्यथा लोकप्रतिनिधींच्याही दारात कचरा टाकू : वेदांतिकाराजे

By admin | Updated: December 10, 2015 01:02 IST

स्वच्छता अभियान : सहभागी होण्याचे सातारकरांना आवाहन

सातारा : ‘शहरामध्ये सध्या कचऱ्याची समस्या फार मोठी आहे. स्वच्छ शहर राखण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. यामध्ये सर्व घटकांनी सहभागी होऊन कर्तव्य सोशल ग्रुपच्या स्वच्छता जनजागृती अभियानाला साथ द्यावी. सातारा शहर कचरामुक्त झाले नाही तर वेळप्रसंगी जिल्हाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या दारातही आम्ही कचरा टाकण्यास मागे पुढे पाहणार नाही, मग दोन्ही राजेंचे बंगले असले तरी हरकत नाही.’ असा खणखणीत इशारा कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका वेदांतिकाराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला.वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, शहर आणि उपनगरांमध्ये अस्ताव्यस्त साचलेले कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी आणि रोगराई पसरत असते. या कचऱ्याला आपणच जबाबदार असतो. शहरातील प्रत्येक वार्डात, गल्ली-बोळात आणि शाहूपुरी, शाहूनगर, विसावा पार्क या उपनगरांमध्येही रोजच्यारोज घंटागाडी फिरत असते. तरीही सुशिक्षित लोक आणि महिला कचऱ्याने भरलेली प्लॅस्टिकची पिशवी रस्त्यावर, नाल्यात, ओढ्यात टाकताना दिसतात. यासाठी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ या वेळेत स्वच्छता जनजागृती अभियान राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.’वेदांतिकाराजे पुढे म्हणाल्या, जाणीव आणि जनजागृती हा अभियानाचा पहिला टप्पा असून, याअंतर्गत कर्तव्य सोशल गु्रपच्या माध्यमातून कचरा निर्मूलनाशी निगडीत विविध प्रकारचे फलक शहरात आणि उपनगरात लावण्यात आले आहेत. या फलकांच्या माध्यमातून कचरा अस्ताव्यस्त टाकणाऱ्यांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे अभियान यशस्वी होण्यासाठी आणि कचऱ्याची समस्या मुळापासून उखडण्यासाठी प्रत्येक नागरिकाला सामाजिक बांधिलकीची जाणीव होणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)नगरसेवकांना २० डिसेंबरची डेटलाईन !नगरसेवकांनीही आपला वार्ड स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे. यासंदर्भात नागरिकांचे प्रबोधन केले पाहिजे. अन्यथा दि. २० डिसेंबर नंतर एखाद्या वार्डात कचऱ्याचा ढीग दिसला तर, तो कचरा संबंधित नगरसेवकाच्या घरासमोर टाकून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे. त्यामुळे ही वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी सर्व नगरसेवक, शहराशी निगडीत असलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्यांनी आपला वार्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सुरुवात करावी, असे आवाहनही वेदांतिकाराजे यांनी केले.