शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा भीक मांगो आंदोलन करू!

By admin | Updated: October 1, 2015 00:32 IST

बनुबाई येलवे : ‘आरपीआय’चा कऱ्हाडमध्ये मोर्चा : तहसीलदारांना निवेदन

कऱ्हाड : ‘शासनाने अवैध धंद्यावर कारवाई करून रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी व तालुक्यातील गरीब शेतकऱ्यांच्या हाताला काम द्यावे, अन्यथा आम्ही भीक मांगो आंदोलन करू,’ असा इशारा रिपब्लिकन पक्षाच्या कऱ्हाडच्या महिला आघाडी प्रमुख संघटक बनुबाई येलवे यांनी दिला.रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष किशोर तपासे यांच्या नेतृत्वाखाली कऱ्हाडच्या महिला आघाडी प्रमुख संघटक बनुबाई येलवे यांनी सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांबाबत निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड यांना निवेदन दिले.यावेळी सुनीता पाटील, कमल सावंत, विजया भंडारे, शालन भंडारे, सुवर्णा भंडारे, सुजाता टोमळे, सुमन पवार, मीनाक्षी दबडे, मीना मोरे, सुमन माने, मनीषा कांबळे, भीमाबाई बनसोडे, शारदा शिवशरण, रेखा भिंगारदेवे, लक्ष्मी साठे, शारदा मोहिते, संगीता वायदंडे, पद्मा थोरात आदींसह टेंभू, कार्वे, हजारमाची, करवडी, मलकापूर परिसरातून महिलांची उपस्थिती होती. निवेदनात म्हटले आहे की, मद्यविक्री व मटका यावर शासनाकडून बंदी घालण्यात आली असली तरी ते छुप्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे राज्य व केंद्र शासनाने यावर तत्काळ कठोर पावले उचलून समाजाचे होणारे नुकसान थांबवावे. सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतमजूर तसेच महिलांना कामधंदा मिळणे कठीण झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतमजुरांसाठी राज्य व केंद्र शासनाकडून रोजगार हमी योजनेचे कामेदेखील सुरू करण्यात आलेली नाहीत. त्यामुळे शेतमजूर अवैद्य धंद्याच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत चालले आहेत. (प्रतिनिधी)