शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

अशास्त्रीय वळणात खंबाटकी बोगदा

By admin | Updated: December 25, 2014 00:05 IST

राष्ट्रीय महामार्ग : अपघातात अनेकांचा मृत्यू; प्रशासन गांधारीच्या भूमिकेत

खंडाळा : सातारावरून पुण्याला जाताना राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणाऱ्या धोकादायक वळणावर आजवर शेकडो प्रवाशांना जीव गमवावा लागलेला आहे. महामार्गावर असणाऱ्या असुविधा आणि अशास्त्रीय वळणांचा धोका यास कारणीभूत असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे. महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा याबाबत सूचित करण्यात आले होते. मात्र, अद्यापही हे प्रशासन गांधारीच्याच भूमिकेत आहे. त्यामुळे अशास्त्रीय वळणांच्या फेऱ्यात अडकलेल्या खंबाटकी बोगद्याचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवासी व जनतेतून होत आहे.या महामार्गावरील बोगदा ओलांडल्यानंतर लगेचच धोक्याचे वळण आहे. व त्यानंतर तीव्र उताराचा रस्ता आहे. त्यामुळे वाहनांचा वेग सांभाळणे चालकांना कठीण जात असते. त्याचबरोबर बोगदा ते खंबाटकी जुना टोलनाका या रस्त्यावर तीन ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. महामार्ग बनविताना शास्त्रीयदृष्ट्या यामध्ये त्रुटी असल्याबाबतचे निदर्शनास आले आहे. या ठिकाणच्या इंग्रजी ‘एस’ आकाराच्या वळणावर तर वारंवार अपघात होत असतात. गेल्या तीन वर्षांत एकूण शेकडो लोकांना प्राणास मुकावे लागले आहे. अपघात झाल्यानंतर तात्पुरत्या उपाययोजना करून महामार्ग प्रशासन सुस्तावले जाते. मात्र, यावर कायमस्वरूपी कोणताही मार्ग काढला जात नाही. गेल्या वर्षभराच्या कालखंडात ‘एस’ आकाराच्या वळणावर झालेल्या जीपच्या अपघातात नऊजण, कंटेनरच्या अपघातात एक जण, खासगी बसच्या अपघातात अकराजण, दुचाकीस्वार तीनजण, बोगदा ओलांडल्यानंतर कारच्या अपघातात तीनजण, कारच्या अपघाता चारजण, बुलेटस्वार एक, कंटेनर पलटी झाल्याने गेल्या महिन्यात आठजणांना प्राण गमवावे गाले आहे. तर वर्षभरात शंभराहून अधिक जखमी झाले आहे. बसच्या अपघातानंतर महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही कोणताही बदल झाला नाही. केवळ धोकादायक वळणांवर पांढरे पट्टे ओढून सूचित करण्यात आले आहे. मात्र, अशास्त्रीय वळणे काढून रस्त्याला योग्य वळण देणे, रस्त्याच्या उतार कमी करणे, याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही.प्रवशांना धोकादायक ठरणाऱ्या या रस्त्याबाबत तातडीने सुधारणा केल्या जाव्यात आणि सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, यासाठी गत महिन्यातील कंटनेर अपघातातील मृतांच्या नातेवाइकांनी उपोषणही केले होते. त्यांनाही कारवाईबाबत आश्वासन देऊन उपोषण मागे घेण्यास सांगितले. पण, महामार्गाच्या सुधारणांच्या कामाला साधी सुरुवातही करता आली नाही.आमदार मकरंद पाटील यांनीही ‘न्हाय’च्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे या महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामात बदल करण्याबाबत सूचना केल्या आहेत. पण, एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची सवय लागलेल्या अधिकाऱ्यांत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि कामातही बदल नाही. त्यामुळे प्रवाशांचा जीवघेणा प्रवास आजही जीव मुठीत घेऊन सुरूच आहे. या कर्दनकाळ ठरणाऱ्या वळणांवर प्रवासामधून कधी सुटका होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)रस्त्यात बदल करण्याची गरजखंबाटकी बोगद्यानंतरच्या वळणावर कायम अपघात होतात. बोगद्यातही संरक्षण लोखंडी ग्रील तुटले आहे. त्यानंतरचे वळण व तीव्र उताराबाबतही सुधारणा नाही. केवळ सूचनाफलक लावून अपघात थांबणार नाहीत. रस्त्यात बदल करणे गरजचे आहे.-किरण खंडागळे, उपसरपंच खंडाळाखंबाटकीच्या परिसरातील अशास्त्रीय वळणे धोकादायक आहेत. या भागात महिन्यातून तीन-चार तरी अपघात होतच असतात. वळणे काढून रस्ता सुरक्षित केला जावा, अशी मागणी अनेकदा केली आहे. मात्र हायवे प्राधिकरण लक्ष देत नाही. याबाबत आता मोठे जनआंदोलन उभे राहिले आहे.- रामदास कांबळे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष