पुसेसावळी : अवयवदान ही आता काळाची गरज असून विविध माध्यमांतून लक्ष वेधण्यात येत आहे. पुसेसावळी (ता. खटाव) येथील अविनाश काशीद यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकार व विविध सामाजिक संस्था यांच्याकडून केल्या जाणाऱ्या अवयवदान जनजागृतीमध्ये खारीचा वाटा घेत अवयवदानाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी विविध पोस्टरच्या माध्यमातून अवयवदान जनजागृती करण्यात येत आहे.
अवयवदान, देहदान, ग्रीन कॉरिडॉर या सर्वांचं महत्त्व किती आहे, अवयवदान म्हणजे नक्की काय? कोणती व्यक्ती करू शकते, कोणती नाही. बॅण्डेड व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजूंना नव्याने आयुष्य मिळू शकते. पण समाजात आजही अवयवदान करण्याबाबत गैरसमजुती आहेत. लोक अवयवदान करण्यासाठी स्वतःहून पुढे येत नाहीत आणि वेळीच अवयव न मिळाल्याने रुग्ण दगावतो. या विचारातूनच या अवयवदानाविषयी ग्रामीण भागातील लोकांपर्यंत परिपूर्ण माहिती पोहोचावी आणि लोकांना अवयवदानासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पोस्टरद्वारे जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.