शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आदेश न्यायालयाचा; श्रेयवाद याचिकाकर्त्यांचा !

By admin | Updated: February 13, 2015 00:47 IST

पाटण : भूकंपग्रस्त दाखले देण्याचा राज्य शासनाला आदेश

पाटण : आजवर लाखो भूकंपाचे धक्के सोसलेल्या पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला मिळू नये, ही आश्चर्यचकित बाब आहे. हे तालुक्यातील आजी-माजी आमदारांच्या लक्षात आल्यानंतर योगायोगाने दोन्ही बाजूंकडून याबाबत उच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकांद्वारे न्याय मागण्यात आला. न्यायालयाने दि. ११ फेबु्रवारी रोजी एकच निकाल देताना राज्य शासनाला ‘पाटण तालुक्यातील भूकंपग्रस्तांना दाखले द्या,’ असे सुनावले. दरम्यान, न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिल्यामुळे याचिकाकर्त्यांनी ‘झाले ते माझ्यामुळेच,’ असे समजून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.दि. ९ डिसेंबर २०११ रोजी केरळ, ता. पाटण येथील बाळासाहेब पवार यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून भूकंपग्रस्त दाखले मिळण्यासाठी दाद मागितली. आमदार शंभूराज देसाई यांनी २०१४ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. बाळासाहेब पवार यांना माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही याचिका दाखल होण्यामध्ये अडीच वर्षांचा कालावधी असल्यामुळे माझ्या प्रयत्नांमुळेच आता यश आले, असे बाळासाहेब पवार यांना वाटत आहे. त्याचपद्धतीने आमदार देसाई हे सुद्धा २००४ सालापासून प्रयत्न केल्याचे विविध दाखले पुराव्यानिशी मांडत आहेत. २००४ ला प्रधान सचिव यांनी भूकंपग्रस्त दाखले देण्याच्या ठरावाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी महसूल सचिवांना आदेश दिले होते, असे आमदार शंभूराज देसाई म्हणतात. बाळासाहेब पवार म्हणतात की, २०११ मध्ये तालुक्यातील अनिता जाधव (रा. केरळ) या मुलीला भूकंपबाधित हा दाखला तहसीलदारांनी दिला होता. तिला आधिपारिचारिका म्हणून नोकरी मिळाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या पडताळणीत दाखला रद्द ठरविला. ती मुलगी नोकरीस मुकली त्यानंतर मंत्री, मुख्यमंत्री यांच्या आदेशाचा काही उपयोग होत नाही. हे लक्षात आल्यानंतर तत्कालीन आमदार विक्रमसिंह पाटणकर यांच्या सल्ल्यानुसार मी याचिका दाखल केली. (प्रतिनधी)श्रेयावाद आणखी कितीकाळ...पाटण तालुक्यातील जनतेला भूकंपग्रस्त असल्याचा दाखला देण्यासाठी उच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. असे असताना आता राजकीय श्रेयवाद चांगलाच उफाळून आला आहे. यापूर्वीही भूकंपग्रस्त दाखल्यावरून पाटण तालुक्यातील अनेकांनी आपले मते मांडली होती. त्यात आता श्रेयवाद सुरू झाला आहे. तरीही न्यायायाचा आदेश आल्याने जनतेत समाधानाचे वातावरण आहे.