शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

मोर्चातील अ‍ॅट्रॉसिटी मागणीला विरोध

By admin | Updated: September 18, 2016 00:06 IST

समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत निर्णय : वेळप्रसंगी विरोधात ठामपणे उभे राहणार

सातारा : ‘छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन हितांच्या विचारांचे आणि बहुजनांचे पालक होते. त्यामुळे छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जातीयवाद्यांना थारा दिला जाणार नाही. हिंदू कोड बिल आणि मंडल आयोगाला विरोध व कोपर्डीचा भावनिक विषय करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टला विरोध करणाऱ्या जातीय मानसिकता असणाऱ्यांचा साताऱ्यात मोर्चा निघत आहे. एकजातीय मराठा क्रांती मोर्चास आमचा विरोधच राहणार आहे,’ असे स्पष्ट मत चंद्रकांत खंडाईत यांनी व्यक्त केले. सातारा येथे समविचारी कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी लक्ष्मण माने, पार्थ पोळके, अ‍ॅड. वर्षा देशपांडे, अशोक गायकवाड, भगवान अवघडे, अमर गायकवाड यांच्यासह पुरोगामी पक्ष संघटनांचे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. खंडाईत म्हणाले, ‘कुणबी मराठा समाज्याच्या मागणीला कोणाचा विरोध नाही. औरंगाबादसह इतर ठिकाणी आरक्षणासोबतच पुरंदरेंना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार परत घ्या, ही मागणी करण्यात आली आहे. बहुजन मराठा समाज आहे त्यांना कुणबी म्हणून शासन स्तरावर आरक्षण दिले. त्यासंबंधी कोणत्या राजकारण्यांनी राजकारण केले, या सगळ्या गोष्टी अलिप्त ठेवून जातीयवादाचे बीज पेरले जात आहे.’ ‘त्याचवेळी जातीवाद करणाऱ्यांना आमचा कडाडून विरोध राहणार आहे. तसा प्रयत्न कोण करत असेल तर त्या विरोधात तेवढ्याच ताकदीने आम्ही रस्त्यावर उतरू. बहुजन समाजातील छोट्या घटकांनी दबून राहू नये. जातीयवादी लोकांच्या कोणत्याही विचाराला जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. वेळप्रसंगी त्यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. लक्ष्मण माने म्हणाले, ‘अ‍ॅट्रॉसिटी कायदा हा केंद्र सरकारच्या अखत्यारितीतील विषय आहे. त्याबाबत मराठा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सभागृहात बोलण्याची गरज असताना आज मराठा समाज ज्या पद्धतीने या कायद्याची मागणी करत आहेत. त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. याबाबत चिंता व्यक्त करून समाजामध्ये तेढ वाढू नये म्हणून कार्यकर्त्यांनी संयम पाळावा.’पार्थ पोळके म्हणाले, ‘कोपर्डीच्या प्रकरणाचे भांडवल करून अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टबाबत चुकीचा गवगवा चालू आहे. सातारा जिल्ह्यात ५ वर्षीय बालिकेवर अमानुष अत्याचार झाला. त्याबाबत मात्र मराठा समाजाने साधा निषेध मोर्चाही काढला नाही.’ अशोक गायकवाड म्हणाले, ‘जो वर्ग गरिबीने पिचलेला आहे, त्यासाठी शासनस्तरावर त्यांना आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे. मात्र, महाराष्ट्रात मोर्चे निघत असताना दलितविरोधी धोरण कोणी राबविण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला ही जशास तसे उत्तर द्यावे लागेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाप्रमाणे आम्ही भारतीय आहोत; पण आम्हाला कोण डिवचत असेल तर आम्ही अशा प्रवृतींचा बंदोबस्त करू. संघर्ष आम्हाला नवा नाही. संघर्षातून दलितांनी आतापर्यंत इतिहास रचला आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याला विरोध करणाऱ्यांना आम्ही थारा देणार नसल्याचा पुनरुच्चारही त्यांनीकेला.’ अ‍ॅड. देशपांडे म्हणाल्या, ‘कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करत असताना मात्र खैरलांजी प्रकरणातील आरोपींना फाशी व्हावी या दृष्टिकोनातून मोर्चेकरांनी कोणतीही भूमिका घेतली नाही. कार्यकर्त्यांनी संयमाने पुढील दिशा ठरवावी.’ (प्रतिनिधी) गायकवाड, खंडाईत यांना सर्वाधिकार...यावेळी अनेक मान्यवरांनी भूमिका मांडताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली मते नोंदविली. तसेच येत्या चार दिवसांत पुन्हा बैठक बोलविण्यात आली आहे. यापुढील बैठकीचे नियोजन आणि सर्वाधिकार अशोक गायकवाड आणि चंद्र्रकांत खंडाईत यांना एकमुखी बहाल करण्यात आले.