शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येच लढतीची शक्यता

By admin | Updated: January 23, 2015 23:37 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक : विविध गटांच्या राजकीय हलचाली गतिमान

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक मे महिन्यात होऊ घातलीय; पण २१ जानेवारी ते २० फेब्रुवारीपर्यंत पात्र व्यक्ती व संस्था यांचे ठराव जमा करण्याची मुदत असल्याने हालचाली गतिमान झाल्या आहेत़ सध्याची परिस्थिती पाहता राष्ट्रवादी व काँग्रेसमध्येच लढतीची शक्यता वर्तविली जात आहे़ जिल्हा बँकेवर अनेक वर्षे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरांचे वर्चस्व होते़ जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा असताना काँग्रेसचे आमदार उंडाळकर जिल्हा बँकेचा कारभार हाकत होते़ ही बाब खटकणाऱ्या अजित पवारांनी गेल्या निवडणुकीत आघाडी घेतली अन् खऱ्या अर्थाने जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात आली़ आता सत्ता कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली आहे़ राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून जिल्हा पक्षाचा बालेकिल्ला आहे़ लोकसभा, विधानसभा निवडणुकीत देशात अन् राज्यात काँगे्रस आघाडीची पिछेहाट झाली असली तरी जिल्हा त्याला अपवाद ठरला. त्यामुळे भाजप, सेनेचे नेते जिल्हा बँकेत कितपत लक्ष घालतील, याबाबत शंका आहे़ भाजप लाटेमुळे दोन्ही काँग्रेसचे नेते अस्वस्थ आहेत़ त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत दोन्ही काँग्रेसचे मिटेल, असे सध्या तरी चित्र नाही़ उलट विधानसभा निवडणुकीतील उट्टे काढण्याची संधी म्हणून अनेकजण या निवडणुकीकडे पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीचे पडसाद शक्यजिल्हा बँकेचे एकेकाळचे किंगमेकर विलासराव पाटील-उंडाळकर सतत बँकेचे संचालक राहिले आहेत़ यंदाही ते रिंगणात राहतील, अशी चर्चा आहे. पण, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपुरस्कृत म्हणून लढणारे उंडाळकर बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून असणार काय, याबाबत उलटसुलट चर्चा आहे़ जिल्ह्यातील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले मूळच्या भाजप, सेना कार्यकर्त्यांकडे संस्थांची संख्या जास्त नसली तरी या नव्यांच्या येण्यामुळे भाजप, सेनेला काहीसे बळ मिळाले आहे, ते बळ बँक निवडणुकीच्या माध्यमातून ते दाखविण्याचा प्रयत्न करणार का, याबाबत उत्सुकता आहे़