शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
5
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
6
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
7
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
8
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
9
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
10
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
11
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
12
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
13
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
14
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
15
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
16
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
17
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
18
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
19
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
20
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण

‘स्थानिक स्वराज्य’चे बिगुल वाजले; सातारा जिल्ह्यात पालिकांना दोन, नगरंपाचयतींसाठी एकसदस्यीय प्रभाग

By सचिन काकडे | Updated: June 12, 2025 13:50 IST

निवडणुकीची उत्सुकता वाढली

सचिन काकडे

सातारा : राज्य शासनाकडून महापालिका, पालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना कशी करावी, याबाबतच्या मार्गदर्शन सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर होऊन निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. शासनाकडून नगरपालिकांना द्विसदस्यीय, तर नगरपंचायतींसाठी एकसदस्यीय प्रभागरचना निश्चित करण्यात आली असून, पालिका व नगरपंचातीच्या एकूण १२६ प्रभागांतून २३९ नगरसेवक यंदा निवडून येणार आहेत.सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व मेढा नगरपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल पूर्ण झाला आहे. राज्यातील सत्ताबदल, ओबीसी आरक्षण व अन्य कारणांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सातत्याने लांबणीवर गेल्या. प्रभागरचना, फेर आरक्षण काढूनही या निवडणुका अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिल्याने निवडणूक प्रक्रियेला आता गती आली आहे. राज्य शासनाने महानगरपालिकांसह नगरपालिका व नगरपंचायतींना नव्याने प्रभागरचना करण्याचे आदेश दिले असून, तशा मार्गदर्शक सूचनाही केल्या आहेत.राज्य शासनाला निवडणूक आयोगाच्या मान्यतेने प्रभागरचना करावी लागणार असून, याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. प्रारूप प्रभागरचना तयार करणे, ती निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठविणे, प्रारूप प्रभागरचनेस मान्यता देणे, प्रभागरचना प्रसिद्ध करणे, हरकती व सूचना मागविणे, सुनावणीच्या अहवालासह अंतिम प्रभागरचना निवडणूक आयुक्त तथा प्राधिकृत अधिकाऱ्याकडे मान्यतेसाठी पाठविणे. यानंतर अंतिम प्रभागरचनेस मान्यता देऊन ती प्रसिद्ध करणे असे प्रभागरचनेचे टप्पे असणार आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच हा कार्यक्रम जाहीर केला जाऊ शकतो.

निवडणुकीची उत्सुकता वाढलीनिवडणुकीचे एकूण चार टप्पे असतात. पहिला प्रभागरचनेचा, त्यानंतर आरक्षण सोडतीचा, तिसरा मतदार याद्या आणि चौथा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे. हे चारही टप्पे महत्त्वाचे असतात. हे सगळे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाला सुमारे तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीचे वेळापत्रक केव्हा जाहीर होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. असे असले तरी प्रभागरचनेच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आल्याने राजकीय मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.

प्रभागरचनेची मार्गदर्शक तत्त्वे

  • प्रभागरचना सुरू करताना सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करावी. उत्तरेकडून ईशान्य (उत्तर-पूर्व) त्यानंतर पूर्व दिशेकडे येऊन पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभागरचना करत सरकावे. शेवट दक्षिणेत करावा. प्रभागांना क्रमांकही त्याच पद्धतीने द्यावेत.
  • प्रभागरचना करताना भौगोलिक सलगता राहील, याची काळजी घ्यावी. प्रभागाच्या सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, फ्लायओव्हर इत्यादी नैसर्गिक मर्यादा विचारात घेउन निश्चित करावी.
  • कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांमध्ये होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे मोकळ्या जागांसह सर्व जागा कोणत्या ना कोणत्या प्रभागात आल्याच पाहिजे. प्रभागरचनेच्या बाबतीत कोणासही शंका घेण्यास वाव राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. सीमेचे वर्णन करताना रस्ते, नाले, नद्या, सिटी सर्व्हे नंबर यांचे उल्लेख प्रामुख्याने यावयास हवे. प्रभागातील वस्त्यांचे शक्यतो नवविभाजन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रभागरचना करताना प्रगणक गट फोडू नये, असे आदेशात नमूद केले आहे.

प्रभागरचनेचा डेटा तयार!जिल्ह्यातील मलकापूर पालिका व मेढा नगरपंचायत वगळता अन्य पालिकांनी प्रभागरचना व ओबीसी आरक्षण २०२२ रोजी निश्चित केले आहे. त्यामुळे नगरपालिकांकडे प्रभागरचनेचा संपूर्ण डेटा उपलब्ध आहे. निवडणूक आयोगाने जर का पूर्वीची प्रभागरचना कायम ठेवली तर पालिकांमधील केवळ आरक्षण बदलू शकते. मात्र, याबाबत काय निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पालिका - प्रभाग - सदस्यसंख्यासातारा - २५ - ५०कऱ्हाड - १४ - २९फलटण - १३ - २७वाई - ८ - २०मलकापूर - ०९ - १९महाबळेश्वर - १० - २०पाचगणी - ०८ - १७रहिमतपूर - १० - २०म्हसवड - १० - २०मेढा (नगरपंचायत) - १७ - १७एकूण - १२४ - २३९