शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उघडले कोयनेचे दार

By admin | Updated: August 7, 2016 23:00 IST

तीन फुटांनी उचलले : कोयना नदीपात्रात १८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

पाटण : कोयना धरणातील पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे रविवारी दुपारी १ वाजून ५० मिनिटांनी तीन फुटांनी उघडले. धरणातून कोयना नदीपात्रात १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण जास्त आहे. पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सहा वक्री दरवाजांमधून १५,६०० असा सुमारे १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. तीन ते चार हजार मिलिमीटर पाऊस कोयना धरण पाणलोट क्षेत्रात कोयना, नवजा, महाबळेश्वर, काठी वळवण, कारगाव, सोनाट, बामणोली, प्रतापगड अशी नऊ पावसाची ठिकाणे आहेत. या सर्व ठिकाणांवरील पर्जन्यमापकावर १ जूनपासून ३ ते ४ हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे ३६, नवजा येथे ३८, तर महाबळेश्वरमध्ये १८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ३.६ टीएमसी पाण्याची आवक धरणाचे दरवाजे रविवारी उघडले त्यावेळी धरणात ८६.१८ टीएमसी पाणीसाठा होता. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ३.६ टीएमसी होती. असा असेल प्रवास धरणातून रविवारी दोनच्या सुमारास पाणी सोडण्यास सुरुवात केली. पाण्याला पाटणला पोहोचण्यास चार तास, तर कऱ्हाडला पोहोचण्यास आठ तास लागतात. तेच पाणी २४ तासांनंतर सांगलीत पोहोचते. त्यामुळे किती गावे पुराने संपर्कहीन झाली, हे सोमवारी दुपारपर्यंत समजेल. जुलैमधील पावसाने आधार कोयना धरणात १ जून रोजी केवळ दहा टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. जून व निम्मा जुलै महिना गेला तरी पाऊस झाला नाही. ९ ते १२ जुलै कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातील पाणीसाठा ५० टीएमसीपर्यंत पोहोचला. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी ६ आॅगस्ट रोजी पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर रविवार (दि. ७) पासून धरणाचे सहा वक्री दरवाजे उघडून पाणी सोडण्यास प्रारंभ केला आहे. कोयना धरणातील पाणी पुढील तीन दिवस स्थिर ठेवण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास दरवाजे पुन्हा बंद करण्यात येतील. १५ आॅगस्टपर्यंत धरणात ९५ टीएमसी पाणीसाठा राखून ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. - वैशाली नारकर, अधीक्षक अभियंता, कोयना धरण