पाटण : जिल्ह्यातील सर्वच धरणे तुडुंब भरली असून, कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातील २,१११ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेल्याने ३५ गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील १३ प्रकल्पांमधून ९० हजार ७०५ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोयनेचे सहा वक्री दरवाजे आज, रविवारी दुपारी दोन वाजता तीन फुटांनी उघडून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे.कोयना पाणलोट क्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी शनिवारपासून धरणातील पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शनिवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या चोवीस तासांत कोयना येथे १९०, नवजा येथे २१५, तर महाबळेश्वरमध्ये १९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात ८५.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाण्याची आवक वाढली आहे.कोयनेचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर कोयना नदीवरील संगमनगर धक्का पूल, नेरळे, मूळगाव, निसरे व कऱ्हाड तालुक्यातील तांबवे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शंभर गावांचा संपर्क तुटण्याची भीती वर्तविली आहे. त्या संदर्भात प्रशासनाने ध्वनिक्षेपक व इतर माध्यमांद्वारे ग्रामस्थांना सावधानतेचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)असे उघडतात दरवाजे...कोयना धरणातील जलपूजन झाल्यानंतर सहा वक्री दरवाजांपैकी प्रथम १ आणि ६ क्रमांकाची दारे उघडण्यात येतील. त्यानंतर २ आणि ५ आणि नंतर ३ व ४ या क्रमाने दरवाजे उघडले जातील. या पद्धतीने दरवाजे उघडल्याने धरणाच्या भिंतीवर पाण्याचा दाब येत नाही.कोयना धरणाच्या भिंतीलगत ८० मेगावॅट क्षमतेचे वीजनिर्मिती गृह आहे. या युनिटमधून सोडलेले पाणी कोयना नदीतूनच संगमनगर धक्का पूल, कऱ्हाड मार्गे सांगलीला जाते.तीन जिल्हाधिकाऱ्यांची संयुक्त बैठककोयना धरणातून रविवारी पाणी सोडण्याचा निर्णय कऱ्हाडच्या शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी साताऱ्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमित सैनी, सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोयना धरणाच्या अधीक्षक अभियंता वैशाली नारकर उपस्थित होत्या.
कोयनेचे दरवाजे आज उघडणार
By admin | Updated: August 7, 2016 01:01 IST