शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड तालुक्यातील ३५ गावांत एकच गणपती!

By admin | Updated: September 6, 2015 20:36 IST

गावांनाही बक्षीस : आदर्श गणेश मंडळांचा पोलिसांकडून गौरव

कऱ्हाड : ‘गणेशोत्सवात सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांना महत्त्व देऊन गणेश मंडळांनी कार्यक्रम राबवावेत. हा उत्सव चैतन्यमय वातावरणात होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नांची गरज आहे. आदर्श गणेश मंडळांना पारितोषिक देण्याबरोबरच कऱ्हाड तालुक्यातील ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबवणाऱ्या गावांनाही पोलीस दलाकडून बक्षीस देण्यात येणार आहे. तालुक्यात ३५ गावांत एक गणपती बसविण्यात येत आहे,’ अशी माहिती पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी दिली.कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यांतर्गत आदर्श गणेश मंडळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी निवासी नायब तहसीलदार बी. एम. गायकवाड, पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.तालुक्यात सुमारे ५८६ गणेश मंडळे आणि जवळपास ३५ गावांत ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात असून, गणेशोत्सव काळात मंडळांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी केले. अप्पासाहेब गायकवाड, रामभाऊ सातपुते, सदाशिव खटावकर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी मार्गदर्शन केले. भरत कदम यांनी सूत्रसंचालन केले. सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)चंद्रसेन मंडळ प्रथम...कऱ्हाड तालुका पोलीस ठाण्यांतर्गत घेण्यात आलेल्या आदर्श गणेश मंडळ स्पर्धेत वसंतगडमधील चंद्रसेन गणेश मंडळाने प्रथम, तांबवेतील हनुमान गणेश मंडळाने द्वितीय, तुळसणच्या नेहरू युवा मंडळाने तृतीय, साकुर्डीतील बाल हनुमान गणेश मंडळ व टेंभूतील आगरकर गणेश मंडळाने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. या मंडळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.