शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या गावाने पुरविले अकरा सुनांचे डोहाळ

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

भुयाचीवाडीमध्ये सामुहिक ओटीभरण : आरोग्यविषयक मार्गदर्शन अन् वेगवेगळ्या चवीचे खाद्यपदार्थ े

उंब्रज. : स्त्री गर्भवती असली की अवघे घर व्याकुळ असते चिमुकल्याला कवेत घेण्यासाठी आणि लाड करण्यासाठी. या आनंदाच्या काळात गर्भवतीच्या तोंडून येणारी प्रत्येक फरमाईश पुरवायची हा घरातील अलिखित नियमच जणू. भुयाचीवाडी गावाने मात्र गावातील ११ गर्भवती महिलांच्या एकत्रित डोहाळे जेवणाचा उपक्रम राबविण्यात आला. भुयाचीवाडी, ता. कऱ्हाड येथील अंगणवाडीत हा कार्यक्रम झाला. महिलांनी विविध खाद्यपदार्थ बनवून आणले होते. गर्भवती महिलांचे ओटीभरण ग्रामपंचायत सदस्या, शिक्षिकांनी केले. महिलांना गर्भ धारणेच्या काळातील आहार, औषधे व व्यायाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी सेविका सुनिता चव्हाण, विजया सूर्यवंशी, कोमल मदने, आरोग्य सेविका अर्पिता देसाई, ग्रामसेविका रोहिणी जंगम, अलका यादव, शोभा गानबावले, छाया शिंदे, वनिता शिंदे, मंदाकिनी सूर्यवंशी यांनी नियोजन केले होते. (प्रतिनिधी)प्रत्येक घरातून खाद्यपदार्थाचे डबेगावात होत असलेल्या या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे या डोहाळे जेवण कार्यक्रमात प्रत्येक महिला आपल्याच घरातील कार्यक्रम असल्याचे समजून कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आमच्या एकत्रित डोहाळे जेवणाचा उपक्रम अभिनव आहे. या कार्यक्रमात आमचे डोहाळे पुरवून आम्हाला आदर्श माता बनण्यासाठीही प्रबोधन करण्यात आले. याबाबत आम्ही आयोजकांचे आभारी आहोत.- रूपाली शिंदे कुपोषित बालक जन्माला आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यापेक्षा ते बालक जन्मापूर्वीच सुदृढ होण्यासाठी या कार्यक्रमाचे आम्ही नियोजन केले. यातून माता व बालकांच्या आरोग्याची काळजी, आहार यांची माहिती देण्यात आली.- सीमा कांबळे, अंगणवाडी पर्यवेक्षिका