शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
3
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
4
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
5
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
6
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
7
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
8
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
9
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
10
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
11
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
12
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
13
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
14
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
15
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
16
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
17
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
18
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर
19
टीम इंडियाविरुद्ध लढवय्या वृत्ती दाखवली; पण एक धाव वाचवण्याच्या नादात करिअर संपलं हे एक अर्ध सत्य
20
नेपाळनंतर आता 'या' देशात Gen Z आंदोलनाचा झंझावात; सरकार कोसळले, राष्ट्रपतींची घोषणा...

नुसत्या घोषणांनी कामे होत नाहीत!

By admin | Updated: March 10, 2016 23:40 IST

प्रतापराव भोसले : यशवंत वारसा आळविताना भाजपवर टीका; राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

कऱ्हाड : ‘देशाच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण यांचे योगदान मोठे आहे. राज्यातील सहकार चळवळीला पुढे नेण्याचे महत्त्वाचे काम चव्हाण यांनी केले. त्यांच्या विचारांची आज मोठ्याप्रमाणात गरज आहे. या सातारा जिल्ह्याने पाच मुख्यमंत्री राज्याला दिले आहेत. त्यांचे वारस आपण आहोत. ही परंपरा पुढे अशी टिकावी आमची भावना आहे. असे सांगत आजच्या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासकामांच्या घोषणा केल्या जात आहेत. घोषणा केल्या म्हणजे कामे केली असे होत नाही,’ अशी अप्रत्येक्षपणे टीका भाजपचे नाव न घेता काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी केली.स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर स्मारक समिती, सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय व शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येथील गाडगे महाराज महाविद्यलायात आयोजित ‘यशवंतराव चव्हाण-विचार आणि वारसा’ या तीन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास गुरुवारी प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन राजमाने, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. अशोक करांडे, बापूजी साळुंखे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील, डॉ. कन्हैय्या कुंदप, सुधीर एकांडे, प्राचार्य पी. टी. थोरात आदी उपस्थित होते.प्रतापराव भोसले म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण हे देशाचे संरक्षणमंत्री असताना त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. त्यांचे मोठ्या प्रमाणात विरोधकही होते. मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी स्वत: कधीही विरोधकांना दुखवण्याचा प्रयत्न केला नाही. पूर्वीच्या काळ फार वेगळा होता. आत्ताचा काळ आणि राजकारणही मोठ्या प्रमाणात बदलले आहे. आज राजकारणात प्रामाणिक नेतृत्व उरले नाही. आत्ताचे सरकार हे नासमज आहे. त्यांच्याकडून शिक्षण व कारखाने, संस्थांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे.’अनंत दीक्षित म्हणाले, ‘यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. त्यामुळे महाराष्ट्राचा बिहार-उत्तरप्रदेश झाला नाही. त्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बदल घडवले. साहित्यिक, समाजसुधारकांनंतर समाजात बदल घडवू पाहणारे दुसरे कोणी असेल तर ते यशवंतराव चव्हाण होय.’प्रा. डॉ. अशोक करांडे यांनी प्रास्ताविक केले. कऱ्हाड जिमखान्याचे अध्यक्ष सुधीर एकांडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आत्ताच्या राजकारण्यांना विमानाचा मोह..‘पूर्वीच्या काळी केंद्रात व राज्यातील राज्यकर्त्यांना विमानात बसण्यासाठी फार कमी संधी मिळत होती. त्याकाळी विमानात बसणाऱ्यांचेही प्रमाण फार कमी होते. मात्र, आत्ताच्या राज्यकर्त्यांना जराही संधी मिळाली की, त्यांचे पाय जमिनीला टेकतच नाहीत. तसेच बाहेरची हवाही त्यांना सहन होत नसल्याने ते विमानातून उतरतच नसल्याचे दिसून येते,’ असे काँगे्रसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांनी सांगितले.