शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 00:46 IST

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे ...

ठळक मुद्दे६०० रुपयांवर दर आल्याने कांदा उत्पादक अडचणीत

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाठ वाढल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली होती. जून महिन्यापासून लागवड केलेला कांदा पीक अडीच महिन्यांत निघाल्यानंतर त्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्याही कांद्याना चांगले दर मिळाले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे चांगले दर टिकून होते; मात्र उशिरा लागण केलेले व विसकटलेले कांदे निघण्यास उशीर झाल्याने एकाच वेळी आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर अगदी पाचशे, सहाशेवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने पोत्यात कांदे भरून निवाºयाला ठेवले आहेत. तर काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत. चांगले दर आल्यानंतर ते विक्रीसाठी नेऊ शकतात; मात्र त्याची विक्री होईपर्यंत त्यात काही प्रमाणात घट निश्चित होत असते. तर अनेकांनी कांदे शेतातच झाकून ठेवून दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

कांदे भरताना मजुरी, पिशवी, भाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण एका क्विंटलला २०० रुपयांवर खर्च येत असतो. या व्यतिरिक्त कांद्याला बियाणापासून, खते, शेतीची मशागत, भांगलणी, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे.कांद्याला शासनाकडून किमान १,५०० रुपयाच्या वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडणार आहे. आता कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.- बाळासाहेब माने, शेतकरी,म्हसवडकांद्याचे दर पडल्याने आम्ही साडेतीनशे पिशव्यांचे कांदे ऐरणी तयार करून त्यात ठेवले आहेत. १५ आॅगस्टच्या दरम्यान चांगले दर आले की त्या ऐरणी फोडून कांदे मार्केटला पाठवणार आहे.- सोमनाथ कवी, म्हसवड