शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ठोक बाजारात कांदा अवघा सहा रुपये किलो

By admin | Updated: January 30, 2017 23:33 IST

लोणंद बाजार : आवक वाढूनही कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

लोणंद : कांद्याने डोळ्यात पाणी आणण्याचा गुण पुन्हा एकदा दाखविण्यास सुरुवात केली आहे. कांद्याची निर्यात सुरू होऊन दरात सुधारणा होण्याची अपेक्षा असताना कांद्याचे दर अचानक आणखी गडगडले आहे. लोणंद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणंद येथील मार्केटयार्डवर सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरू झाले, तेव्हा बाजारात कांद्याचे भाव कोसळले. ठोक बाजारात कांदा अवघ्या पाच ते सहा रुपये किलोवर घसरला आहे. खंडाळा तालुक्यातून तसेच फलटण आदी भागातून लोणंद बाजारामध्ये कांदा उत्पादन शेतकरी दर सोमवारी आणि गुरुवारी कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. वाहनभाडे, हमाली, मापाडी, उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे व कांद्याच्या आवकामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने कांद्याच्या सरासरी दरामुळे अवघ्या पाचशे ते सहाशे रुपये क्विंटल दर स्थिरावले असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आहे. परिसरातील सर्वच भागातून गरवा कांदा एकाच वेळी बाजारात आल्याने सध्या लोणंद बाजार समितीत कांद्याची मोठी आवक झाली आहे. त्यातच गुजरात, राजस्थान, कर्नाटकासह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणावर व स्वस्तातील कांद्याची मोठी आवक होत असल्याने निर्यात दरांनी लोणंदच्या कांद्याकडे पाठ फिरवली आहे. लोणंद मार्केटमध्ये कांद्याचे भाव कमी झालेले दिसत आहे. बाजार समितीत कांद्याच्या दरात एक नंबर सहाशे ते सातशे, दोन नंबर कांदा ४५० ते ६००, गोल्टी कांदा २५० ते ४५० पर्यंत निघाले होते. (वार्ताहर)