शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात कांद्याला मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ होत असून, गुरूवारी क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळाला. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा बाजार समितीत कांद्याच्या दरात वाढ होत असून, गुरूवारी क्विंटलला चार हजारांपर्यंत दर मिळाला. मागील अडीच महिन्यातील हा उच्चांकी भाव ठरला. तर भाजी मंडईत चांगला कांदा ५० रुपयांच्या पुढे गेला आहे. त्याचबरोबर कोबीला अजूनही कवडीमोल दर मिळत आहे.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतीमाल येतो. सातारा, जावळी, कोरेगाव, खटाव, माण, वाई, फलटण या तालुक्यातून भाजीपाला येत असतो. तसेच पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातूनही काही प्रमाणात शेतीमाल येतो. दर गुरूवारी आणि रविवारी मालाची अधिक आवक होते.

तीन महिन्यांपूर्वी कांद्याचा क्विंटलचा दर साडेसहा हजारांपर्यंत पोहोचला होता. तर भाजी मंडई, दुकानात कांद्याची किरकोळ विक्री ७० ते ८० रुपये किलोने होत होती. पण, त्यानंतर कांद्याचा दर हळूहळू कमी झाला. मात्र, दीड महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्याची घोषणा केल्यानंतर दरात थोडी सुधारणा झाली.

मागील काही दिवसात सातारा बाजार समितीत कांद्याला १ हजारापासून ३,८०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत आहे. मात्र, या गुरूवारी ३२९ क्विंटलची आवक झाली तर ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत दर गेला. एक नंबर कांद्याला ३ ते ४ आणि दोन नंबरच्या कांद्याला २ ते ३ हजारापर्यंत दर मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सातारा बाजार समितीत गुरूवारी ५९ वाहनांतून ५६५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. आवक चांगली असली तरी अजूनही अनेक भाज्यांना चांगला दर मिळत नाही. गवारचा दर तेजीत होता. गवारला १० किलोला ५०० ते ६०० रुपये दर मिळाला. तसेच शेवगा शेंगला ४०० ते ५०० रुपये भाव मिळाला. वांग्याला १० किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला. टोमॅटो ८० ते १००, कोबीला ३० ते ४० रुपये भाव मिळाला. टोमॅटो व कोबीला अजूनही कमीच दर मिळत आहे. तर फ्लॉवरला १० किलोला ६० ते १०० रुपये अन् दोडक्याला ३०० ते ३५० रुपये दर मिळाला.

बटाट्याला क्विंटलला ८०० पासून १,५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. हिरव्या मिरचीला क्विंटलला ३ ते ४ हजार रुपये भाव मिळाला. आल्याला १ हजार ते १,८०० रुपये दर मिळाला. लसूणला क्विंटलला ३ ते ७ हजारांपर्यंत भाव मिळाला. वाटाणा अजूनही स्वस्त असून, २,५०० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळाला.

चौकट :

पालेभाज्यांच्या दरात चढ-उतार

सातारा बाजार समितीत पालेभाज्यांची आवक चांगली होत आहे. पण, दरात सतत चढ-उतार सुरू आहे. गुरूवारी मेथीच्या १,६०० पेंडींची आवक झाली. मेथीला शेकडा ५०० ते ६०० रुपये दर मिळाला तर कोथिंबीरची १,२०० पेंडी आली. याला शेकडा दर अवघा ४०० ते ५०० रुपयांदरम्यान मिळाला. पालक पेंडीला शेकडा ३०० ते ४०० रुपये दर बाजार समितीत मिळाला.

......................................................