शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

एक राजे सेनेसोबत, दुसरे भाजपसोबत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2017 23:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतदानावेळी अनेक छुप्या युत्या उघडकीस आल्या. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी तासभर चर्चा केली तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार मकरंद पाटील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप नेत्यांसोबत उघड चर्चेतून भाजपशी केलेल्या सलगीचे जाहीरपणे विवेचनच ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतदानावेळी अनेक छुप्या युत्या उघडकीस आल्या. जलमंदिर पॅलेस येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी तासभर चर्चा केली तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आमदार मकरंद पाटील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात भाजप नेत्यांसोबत उघड चर्चेतून भाजपशी केलेल्या सलगीचे जाहीरपणे विवेचनच केले. त्यामुळे ‘एक राजे सेनेसोबत तर दुसरे भाजपसोबत,’ असे नवे चित्र साताºयाच्या राजकीय पटलावर तयार झाले आहे.जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रांवर मतदान झाले. सकाळी आठ ते सायंकाळी पाच या कालावधीत ३९० मतदारांपैकी ३८७ मतदारांनी मतदान केले. नगरपालिकेच्या दोन तर नगरपंचायत विभागातील एका मतदाराचे मतदान झाले नाही. मतदान असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वारापासून ५० मीटर अंतरावर पोलिसांनी बॅरिगेटस लावले होते. मतदार वगळता इतर व्यक्तींना तिथून पुढे पोलिसांनी प्रवेश नाकारला. जिल्हा परिषद मतदारसंघातील ६४ पैकी ६४ मतदारांनी मतदान केले. नगरपंचायतीच्या १३६ मतदारांपैकी एक मतदान वगळता बाकीच्या १३५ मतदारांनी मतदान केले. तर नगरपालिकेच्या १९० मतदारांपैकी दोन मतदारांनी मतदान केले नाही. १८८ मतदारांनी मतदान केले. जिल्हा परिषदेसाठी शंभर टक्के मतदान झाले. नगरपंचायतीसाठी ९९.२६ टक्के व नगरपालिकेसाठी ९८.९५ टक्के मतदान झाले.‘लोकमत’ने यापूर्वी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार काँगे्रस व शिवसेना हे दोन पक्ष खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत राहिले. खासदार उदयनराजे भोसले यांनी रविवारी आमदार शंभूराज देसाई यांच्या साताºयातील ‘कोयना दौलत’वर जाऊन चर्चा केली होती. तर सोमवारी आमदार शंभूराज देसाई यांनी जलमंदिरवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली. शिवसेना, सातारा विकास आघाडी व काँगे्रसचे मतदार एकत्रितपणे मतदानासाठी आले. राष्ट्रवादी व भाजप नेत्यांची रविवारी व सोमवारीही खलबते झाली. जिल्हा शासकीय विश्रामगृहावर या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ‘नियोजन’ केले. यानंतर भाजपचे मतदार मतदानासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. नगरपंचायतीचे मतदान दुपारी दोन वाजताच तब्बल ९७.७ टक्के झाले होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मतदानासाठी राष्ट्रवादीचे मतदारच न आल्याने भाजपने जिल्हा परिषदेचे मतदान थांबविले होते. राष्ट्रवादीचे मतदार आल्यानंतरच भाजप मतदारांनी मतदान केले.