शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाडेगावजवळ अपघातात एक ठार; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:47 IST

लोणंद : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगावजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन जीपची भीषण धडक बसली. यामध्ये एकजण ठार झाला ...

लोणंद : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगावजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन जीपची भीषण धडक बसली. यामध्ये एकजण ठार झाला असून, आठजण जखमी झाले. जखमींवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुलाब सत्तू हाके (वय ५५, रा. शेडगेवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील हाके परिवार आपल्या नातेवाइकांसह रविवारी बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे नायकोबाच्या जत्रेला निघाले होते.पाडेगाव हद्दीतील बागवान पेट्रोलपंपा समोर आले असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या जीपने (एमएच ४२ के ८७६६) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात (एमएच १२ केपी ७६३८) या जीपला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, जीपने तीन पलटी खाल्ली. या अपघातात जीपमध्ये मागे बसलेले गुलाब सत्तू हाके यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर आठजण जखमी झाले. तर इतर आठजण जखमी झाले. जखमींना तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.जखमी मंगल हाके (वय २८), तायडाबाई हाके (४८), रखमाजी हाके (६०), जयश्री हाके (४५), दीपाली कोंडिबा हाके (३०), बाळू विठू हाके (७०), सुधांशू धोंडिबा हाके (८), रेश्मा हिंदुराव हाके (२६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर तपास करीत आहेत.