शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यात शंभर पोती गुटखा जप्त

By admin | Updated: December 31, 2014 00:21 IST

ट्रकचालक ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखा, अन्न व औषध प्रशासनाची संयुक्त कारवाई

सातारा : स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने मंगळवारी रात्री उशिरा संयुक्तपणे कारवाई करत शंभर पोती गुटखा जप्त केला. याप्रकरणी चालकाला ट्रकसह ताब्यात घेतले असून त्याच्याकडून माहिती घेण्याचे काम सुरू होते.या संदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जप्त करण्यात आलेल्या गुटखा पुड्यांची किंमत कोट्यवधी रुपये असल्याची सांगण्यात येते. ताब्यात घेतलेल्या ट्रकचालकाचे नाव संतोष शिवमूर्ती पिसुरे (रा. मूळ गाव, बदलापूर पूर्व, ता. अंबरनाथ, जि. ठाणे) असे आहे. जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याची माहितीही यावेळी पोलिसांनी दिली. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे कर्मचारी पहाटेपर्यंत गुटखा पुड्या मोजण्याचे काम करत होते. याबाबतची अधिक माहिती अशी की, शाहूपुरी येथे एका ठिकाणी शंभर पोती गुटखा असून, तो येथून आज रात्री हलविण्यात येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली. यानंतर सापळा रचण्यात आला. शाहूपुरी परिसरात ज्यावेळी ट्रकचालक संतोष पिसुरे यास ताब्यात घेण्यात आले त्यावेळी तो काही बोलायला तयार नव्हता. मात्र, नंतर त्याने आवश्यक ती सर्व माहिती दिली. नंतर पोलिसांनी ट्रक (एमएच 0५ एएम ३0३३) स्थानिक गुन्हे शाखेत आणला. येथे ट्रकचालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ट्रकमध्ये शंभर पोती गुटखा असल्याचे सांगितले. यानंतर पोलीस कर्मचारी ट्रकमधून गुटखा बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत करत होते. याची किंमत कोट्यवधी रुपये असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)